सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा बुथ समन्वयक बैठक संपन्न.
निवडणूकांच्या पुर्वतयारीसाठी आतापासूनच तयारीला लागा - आ.अब्दुल सत्तार ;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०४ ) -
वाडी - वस्ती - तांड्यांसह गावा - गावांतील काँग्रेस कार्यकर्ते - पदाधिकारी - नागरिकांनी पुढील निवडणुकांच्या पुर्व तयारीसाठी आतापासूनच मरगळ झटकून पूर्ण ताकदीने लागा असे आवाहन माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केले.
सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील बुथ समन्वयकांची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा मराठवाडा समन्वयक भिमराव आबा डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत आ.अब्दुल सत्तार यांनी बुथ समन्वयक काँग्रेस कार्यकर्ता हा तळागाळातील नागरिकांच्या विविध समस्या जाणुन घेऊन अडी - अडचणी सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न करीत एक सक्षम कार्यकर्ता म्हणून चिकाटीने काम करायला हवे. एका बुथवर पंचविस युवकांची कार्यकारिणी तयार करुन काँग्रेस पक्षाचे हित जोपासतांना पुढील निवडणुकांच्या पुर्व तयारीसाठी आतापासूनच तयारीला लागण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
यावेळी मराठवाडा समन्वयक भिमराव आबा डोंगरे , औरंगाबाद शहराध्यक्ष माजी आ.नामदेवराव काळे, माजी आ.कल्याणराव काळे, माजी जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,व्यापारी महासंघाचे जिल्हाअध्यक्ष जगन्नाथराव काळे, संभाजी पाटील डोणगावकर, आदिंनी उपस्थित समन्वयकांना काँग्रेस पक्षाचे ध्येय - धोरण - पुढील निवडणुकांच्या पुर्व तयारीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन,नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,जितसिंग करकोटक,रामुकाका शेळके,प्रशांत सदाफळ,विनोद तांबे,रविंद्र काळे,अशोक मगर,अशोक सुर्यवंशी,शांतीलाल अग्रवाल,प्रा.मन्सूर कादरी, रमेश पाटील साळवे,दामुआण्णा गव्हाणे,सतिश ताठे, अली चाऊस, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,अकिल वसईकर, विठ्ठलराव सपकाळ,सलिम हुसैन,राजरत्न निकम,कैसर आझाद,राजू दुधे,राजु बागवान,हनिफ मुल्तानी, संजय मुरकुटे,निजाम पठाण,खालेद पटेल,कुणाल सहारे,राहुल गव्हाणे,अमित आरके,मनोहर आरके,रवि आरके,आदिंसह कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें