जमाते इस्लामी हिंद च्या वतीने ईफ्तार पार्टी.
शे.सलिम.भोकरदन येथें टिपू सुलतान चौक मधे जमाते इस्लामी हिंद चा एक वर्ग दावत विभाग च्या वतीने भोकरदन येथें ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या ईफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा एक संदेश शेख इमरान जिलानी यांनी आपल्याला भाषण च्या माध्यमातून दिला.. शेख इमरान यांनी आपल्या चर्चेत सांगितले की इस्लाम धर्माचे पाच मुल स्तंभ आहेत त्यात प्रधम इमान आहे इमान म्हणजे अल्लाह वर खरी श्रद्धा, दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात.. या मुल स्तंभातले तिसरे म्हणजे रोजा.. हे रोजा प्रत्येक सज्ञान पुरुष व स्त्रि वर अनिवार्य आहे आणि बंधनकारक आहे, पवित्र ग्रंथ कुरान मध्ये रोजा संबंधित उल्लेख आढळतो की अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या पुर्वी जेवढे मानवी समूह या धर्तीवर येऊन गेले त्या प्रत्येक समूहावर रोजा अनिवार्य होता, आजच्या काळात सुध्दा रोजा अनिवार्य आहे आणि प्रत्येक पुरुष स्रि मे महिन्याच्या तापत्या ऊणेला ना घाबरता
रोजा धरतात हि अल्लाह वर खरी श्रद्धा आहे, रोजेचा उद्देश केवळ उपाशी राहणे नाहीं, रोजा ठेवल्या वर खरे बोलने, खोठे बोलण्यातून स्वताला वाचविणे, कोणाला ही त्रास ना देणे, चांगली कामे करणे असा तकवे पाळावेत लागतात.. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शेख अब्दुल कुद्दूस यांनी सुध्दा आपले विचार मांडले.. या वेळी पंच्यात समिती चे माजी सभापती लक्ष्मण दलवी, नगरसेवक रनवीर देशमुख, दीपक बोर्डे, जमाते इस्लामी हिंद शहर अध्यक्ष सय्यद अश्फाक, हाजी शफिक, सय्यद शफात, शेख मोबीन, सह शहरातील हिंदू मुस्लिमांनी ईफ्तार पार्टीचा आनंद घेतले...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें