चारठाणा पोलीस ठाण्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निषेध मोर्चा ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

चारठाणा पोलीस ठाण्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निषेध मोर्चा !

चारठाणा पोलीस ठाण्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा निषेध मोर्चा !

चारठाणा. ( प्रभाकर कुर्हे )                         
 जिंतुर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्यावर मासेमारी करणार्‍या एका युवकास स्थानिक  पोलीस व गुंड प्रवृतीच्या लोकांकडुन झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ  भारतीय कम्युनिस्ट  पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या कडे एका लेखी निवेदनाव्दारे गुरुवार २१ जुन रोजी करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर किसन कुटारे या मच्छीमारास सोमवार १८ जुन रोजी काही गुंड प्रवुतीचे इसमानी मासे चोरल्याचा आरोप करीत मारहाण केल्याची व  एका वाहनात कोंबुन जबरदस्तीने चारठाणा पोलीस ठाण्यात आणल्याची घटना घडली. या वेळी साहयक पोलीस निरीक्षक  व दोन कर्मचार्‍यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता संबधीत मच्छीमार युवकास  मारहाण करण्याचा आरोप निवेदनात नमुद करण्यात आला आहे. दरम्यान मच्छीमाराला मारहाण करण्याच्या निषेधार्थ गुरुवारी चारठाणा टि पाॅइटपासुन पोलीस ठाण्या पर्यंत काँ.राजंन क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली मोेर्चा काढण्यात आला या वेळी चारठाणा पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस ठाण्या समोर मोर्चे करी समोर बोलतांना  कम्युनिस्ट पक्षाचे रांजन शिरसागर यांनी पोलीस व गुंड प्रवुतीच्या लोकासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की कोणत्याही प्रकरणात पोलीसांनी अगोदर चौकशी करावी चौकशी अंती संबधीत दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करणे  गरजेचे आहे.परंतु असे न करता गुंडप्रवृतीच्या लोकांच्या इशार्‍या‍वर पोलीसांनी संबधीत मच्छीमारास नाहक बेदम मारहाण केली आहे.विशेष म्हणजे संबधीत युवक हा जगदंबा मच्छीमार संस्थेचा सभासद असुन त्यांना सदरील तलावात मासेमारी करण्याचा संपुर्ण अधिकार अाहे. या संर्दभात वेळो वेळी सर्वोच न्यायालयाने निर्देश जारी केले आहेत असे सांगितले या निवेदनावर रांजन शिरसागर, माणिक कुटारे, ज्ञानेश्वर कुटारे,ज्ञानेश्वर लहिरे याच्या सह आनेक समाज बांधवांच्या निवेदनावर सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें