जलसंधारणाची कामे चांगल्या दर्जाचे करुन घेण्याची ग्रामस्थांचीही जबाबदारी - आ.अब्दुल सत्तार ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

जलसंधारणाची कामे चांगल्या दर्जाचे करुन घेण्याची ग्रामस्थांचीही जबाबदारी - आ.अब्दुल सत्तार ;

जलसंधारणाची  कामे चांगल्या दर्जाचे करुन घेण्याची ग्रामस्थांचीही जबाबदारी  - आ.अब्दुल सत्तार ;

बोरगाव कासारी - जिवरग टाकळी येथे सिमेंट बंधारा - पाझर तलाव दुरुस्ती कामांचे उदघाटन ;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 03
जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा कामे - पाझर तलाव दुरुस्तीसह जलसंधारण कामे प्रभावीपणे राबविण्यात येत असतांना कामे निकृष्ठ दर्जाचे करण्यात येऊ नये यासाठी गावा - गावातील नागरिकांनीही या कामांवर लक्ष केंद्रित करून कामे चांगल्या दर्जाचे करुन घेण्याची गरज असल्याचे मत आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी - जिवरग टाकळी येथे जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा तसेच पाझर तलाव दुरुस्ती कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कामे हि निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत असुन कोट्यावधी रुपये खर्चूनही अनेक कामांमध्ये पंधरा दिवसही पावसाचे पाणी थांबत नसल्याचे चित्र समोर येत आहे.अधिका-यांकडून जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कामे करतांना निकृष्ठ दर्जाचे होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी तसेच गावा - गावांतील पदाधिकारी - नागरिकांनीही या जलसंधारण कामांकडे लक्ष केंद्रित करून कामे चांगल्या दर्जाचे करुन घेण्याची गरज असल्याचे मत माजीमंञी आ अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती नंदकिशोर सहारे ,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,शांतीलाल अग्रवाल, विठ्ठलराव सपकाळ,सतिश ताठे,विश्वासराव दाभाडे, हनिफ मुल्तानी,दामुआण्णा गव्हाणे,संजय मुरकुटे, गुलाबराव मिरगे,सुखदेव जिवरग,सुभाष जाधव, जमिर मुल्तानी,कृष्णा लोखंडे,अक्षय मगर,नाना कळम ,नाना गुरुजी लघु सिंचन अधिकारी सोनुने,दांडगे,आदींसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें