विजवितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे शाँक लागून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू .
प्रतिनिधी.मुस्तखीम बेलदार.
मानवत तालुक्यातील लोहरा येथील घटना, उसाला पाणी देत असताना शेतातील विजपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे डिपी वर फ्यूज टाकण्यासाठी गेलेल्या भास्कर जाधव वय वर्ष ४० या तरुण शेतकऱ्याचा संपुर्ण डिपी करंट उतरल्यामुळे बाँक्सला उघडण्यासाठी हात लावला असता शाँक लागून जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाला हि घटना मानवत तालुक्यातील लोहरा येथे १५ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली दरम्यान विजवितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे मानवत तालुक्यातील लोहरा येथील भास्कर माणीकराव जाधव वय ४० वर्ष या शेतकऱ्यास लोहरा शिवारात चार एकर जमीन आहे शेतात उस लावल्यामुळे भास्कर जाधव हे १५ जून रोजी सकाळी ७ वाजता उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते परंतु तासा भरात पाणी देत असताना अचानक लाईन गेल्यामुळे भास्कर जाधव हे शेताजवळ असलेल्या डिपी वर फ्यूज टाकण्यासाठी गेले होते माञ यावेळी काही फाँल्ट मुळे संपुर्ण डिपी वर करंट उतरला होता हे जाधव यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांनी डिपी वर असलेला बाँक्स उघडण्यासाठी बाँक्स ला हात लावला असता विजेचा शाँक लागून या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी शेताजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांच्या सदरील घडलेली घटना लक्षात आली असता त्यांनी या शेतकऱ्यास परभणी येथे शासकीय रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डाँक्टरानी त्यास मृत घोषीत केले त्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर भास्कर जाधव यांच्या पार्थदेहावर लोहरा येथे दुपारी दोन च्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आप्तगणासह परीसरातील हजारोजण उपस्थित होते विजवितरण कंपणीच्या हलगर्जी पणामुळे तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे लोहरा गावावर शोककळा पसरली असून सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहीती मिळताच पाळोदी येथील विजवितरण सब स्टेशनचे इंजि.कंदीकुलवार यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे त्यांच्या पश्चात आई ,वडील ,भाऊ, पत्नी, दोन मुल, एक मुलगी ,असा परीवार आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें