सेलूत शिवसेनेचे जेलभरो अांदोलन शेतकर्यांच्या प्रश्नासाठी शिवेसेना अाक्रमक : शेकडो शिवसैनिकांना अटक व सुटका.
समशेर खान.
सेलू ता. 15(प्रतिनिधि):-पिकविमा व पिक कर्ज शेतकर्यांना तत्काळ उपलब्ध करून देणे व तुर अाणि हरबरा खरेदीसाठी दोन महिण्याची मुद्दत वाढ द्यावी या मागणीसाठी येथिल शिवसेनेच्या वतिने शुक्रवारी (ता.१५) रोजी सकाळी अकराच्या सुमारास जेलभरो अांदोलन केले.या अांदोलनातील शकडो शिवसैनिकांना अटक करून सोडण्यात अाले.यावेळी शिवसेनेच्या वतिने नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना निवेदन देण्यात अाले.
दिलेल्या निवेदनात नमुद केले अाहे की, शेतकर्यांनी पीक विमा भरून व तो मंजुर होवून देखील अद्यापपर्यंत शेतक-यांना मिळाला नाही. तसेच तालुक्यामध्ये बोंडअळी तसेच गारपिट झालेली असतांना मात्र अद्यापर्यंत शेतक-यांना मोबदला मिळालेला नाही.तुर हरभरा खरेदी होवु नही शेतक-यांना त्यांचा मोबदला अद्यापर्यत मिळालेला नाही. यामुळे तालुक्यातील शेतक-यांना पेरणीसाठी आर्थीक आडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब शासनस्तरावरुन गांभीरयाने घेतली जात नाही. यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. तर कर्जमाफी होवु नही शेतक-यांना नवीन, कर्ज उपलब्ध होत नाही. तुर तसेच हरभरा खरेदी केंद्र दोन महिने मुदत वाढ देण्यात यावी कारण की शेतक-यांची तुर व हरभरा शासनस्तरावरुन खरेदी करण्यात आला नाही. ही खरेदी पुर्ण करण्यात यावी आदी मागण्यासाठी शिवसेनेच्या वतिने जेलभरो आंदोलन करण्यात आले. या जेलभरो आंदोलनात ता. अध्यक्ष रणजीत गजमल, नगरसेवक संदिप लहाने, युवा ता.प्रमुख जयसिंग शेळके, सुधाकर पवार, अविनाश शेरे, मंगलताई कथले, काशिनाथ घुमरे, पांडुरंग कावळे, दत्ताराव झोल, बाबा भाबट, आंकुश लोंढे, जिजाभाऊ शोळंके, छत्रगुण मगर, गोपाल कदम, रामभाऊ बहीरट, कैलाश गजमल, रामा कदम, शेषेराव वाघमोडे, गोविंद शर्मा, वैभव वैद्य, गोविंद सोळंके आदीसह शेतकरी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें