शिवसेना सदैव सर्वसामाण्या साठी रस्त्यावर ----राम खराबे पाटील.
शिवसेनेचा रास्ता रोको,जेलभरो आंदोलनास प्रतिसाद.
जिंतूर ---- शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात आज दि 15 जून रोजी विविध मागण्या साठी खा संजय जाधव यांच्या मार्गदर्शना खाली जिंतूर सेलू विधानसभा प्रमुख तथा जि प गटनेते राम नाना पाटील यांच्या नेत्रत्वात रास्ता रोको आंदोलन व जेलभरो आंदोलन पार पडले यात तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिकांचा समावेश होताया रास्ता रोको आंदोलना मुळे औबाद हैद्राबाद हा राज्यरस्ता क्र222 व जिंतूर परभणी औंढा हे मार्ग काही काळा साठी प्रभावित झाले होते
या वेळी मार्गदर्शन करताना राम खराबे पाटील यांनी शिवसेना नेहमी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य यांच्या प्रलंबित मागण्या साठी सदैव पाठीशी राहून नेहमी सत्तेत असो की नसो पण आंदोलन करत राहील शिवसेनेचा जन्म हा अन्याय विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलना करण्या साठी झालेला असून स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर सेना नेहमी अन्याय विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनात कमी पडणार नाही परभणी जिल्ह्यात रिलायंस कंपनी तर्फे तूर सोयाबीन मूग उडीद कापूस आदी पिकाचा विमा शेतकऱ्यां मार्फत उतरविण्यात आला पण 50 टक्के पेक्ष्या कमी आणेवारी आलेली असताना सुद्धा कंपनीने विमा परतावा न देऊन फसवणूक केली असल्याचा आरोप खराबे पाटील यांनी आपल्या भाषणात केला कमी आणेवारी दाखवणाऱ्या महसुली अधिकार्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी सह शासनाच्या हमी भाव नुसार ऑनलाईन नोंदणी झालेल्या तूर हरबरा या पिकाची खरेदी शासकीय दरा प्रमाणे झाली पाहिजे असेही निवेदनात नमूद करण्यात आले सदर निवेदन रास्ता रोको आंदोलन स्थळी महसुली अधिकार्या तर्फे स्विकारल्या नंतर रामखराबे पाटील व असंख्य शिवसैनिकांना पोलीस निरीक्षक प्रविन मोरे यांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली या वेळी राम शर्मा कांता धानोरकर मांगीलला राठोड परमेश्वर ठोबरे रितेश पांडे जनक जाधव गणगाढर मोरे मधुकर चणईकर विरुभाऊ बांगर रमेश संगेकर अशोक खडागळे प्रल्हाद राऊत लखन माने संदीप घुगे रामप्रसाद कंठाळे किरण देशमुख गजानन पायघन अरविंद कटारे वसंत घुगे श्रीहरी घुगे आदी शिवसैनिकांचा समावेश होता
या वेळी पोनि मोरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें