दफणविधीची नमाज पढण्यासाठी कब्रस्थानमध्ये शेडचे उदघाटन.
भोकरदन प्रतिनिधी : नगरपरिषद प्रभाग एक (ब) चे नगरसेवक नसीम पठाण यांच्या विषेश प्रयत्नाने भोकरदन आलापुर परीसर येथील कब्रस्तान मध्ये मुस्लिम समाजासाठी दफनविधी अगोदर नमाज़ जनाजा पठण करण्यासाठी शेड बांधण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे.अनेक महिन्या पासून मुस्लिम समाजाची हि मागणी होती व वेळोवेळी नसीम पठाण यांनी या कामासाठी नगरपालिकेकडे मागणी केली यांच्या मागणीला शेवटी यश मिळाले. श्री पठाण यांनी दहा लाख तीस हजार रुपये (१०३००००) भोकरदन नगरपरिषद कडून कब्रस्तान येथे शेड बांधण्यासाठी हा निधी मंजूर करुन आणले आणि आज दि. 0९/0६/२०१८ शुक्रवारी रोजी शेड च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगरपरिषद चे उपाध्यक्ष इरफान सिद्दीकी, नगरसेवक नसीम पठाण, अजहर शाह, दिपक तळेकर, शेख रिजवान, आणि इतर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें