भोकरदन शहरासह तालुक्यात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा.
भोकरदन प्रतिनिधी : शे.सलिम.शहरातील विविध शाळा,महाविद्यालय,शासकीय,निमशासकिय कार्यालय,पोलिस ठाणे,सह भाजपा प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांच्या निवासस्थानी योगदिन साजरा करण्यात आला.
दरम्यान भाजपा प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांच्या निवासस्थानी "करा योग रहा निरोग "ही संकल्पना आत्मसात करून आ संतोष पा दानवे यांनी ' एकदिवसीय संगीतमय योग प्रशिक्षण' जालना येथील संतोष तौर,व कदम सर यांनी भोकरदन नागरिकांना दिले. यावेळी त्यांनी विविध प्रकारची योगसाधंना,मन शांती साठी चे योग करून घेतले.
या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त भाजपा प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांनी सांगितले की,आपले जिवन आनंदी ठेवायचे असेल,तान तनाव मुक्त जिवन जगण्यासाठी योगसाधंना अवश्यक आहे.' जो करेल योग तो राहिल निरोग',देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 21.जुन ला जागतिक पातळीवर योग दिन म्हणून मान्यता मिळवली व गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण जग आज योगदिन साजरा करीत आहे. याच दिवशी योग करा पण या योग साधनेची संकल्पना योग क्रिया दररोज करून आपले शरीर निरोगी ठेवा असा सल्ला देवून खा रावसाहेब पा दानवे म्हणाले की मी गेली 20.वर्षा पासून सतत दररोज कोठेही असलो तरी व्यायाम व योग करीत असतो. तर यावेळी आयोजक आ संतोष पा दानवे यांनी सांगितले की आज च्या तरूण पिढी लाच नव्हे तर सर्वांनी च नियमित न चुकता आपल्या शरीरासाठी एक तास देवुन योग व व्यायाम करावाच,जिवनांत शरीर सपंत्तीच ही मोठी आहे ती निरोगी ठेवायची असेल तर योग करायलाच पाहिजे. व्यसन मुक्त रहा असा सल्ला ही तरूणांना आ संतोष पा दानवे यांनी दिला.
यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांच्या निवासस्थानी,अन्तरराष्टीय योग दिना निमित्त आयोजित एक दिवसीय संगीतमय योग प्रशिक्षणास भाजपा प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे,आ संतोष पा दानवे,नगरपरिषद चे मुख्याधिकारी अमित कुमार सोडगे,पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी,भाजपा शहर अध्यक्ष सतीश रोकडे,,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दिपक जाधव,जि प सदस्य डाॅ चंद्रकांत साबळे,नगरसेवक राहूल ठाकुर,दिपक बोर्डे,प्राचार्य भगवान डोंगरे,प्राचार्य मानिक दानवे,रमेश पांडे,जि प सदस्य डाॅ चंद्रकांत साबळे,गणेश हिरेकर,विजय कड,रमेश बिरसोने,विजय मतकर,शांताराम गव्हाने,सह डॉक्टर,वकील,पञकार,व्यापारी,मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें