रमजान ईदनिमित्त बाजार फुलला...!
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त भोकरदन बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी.
भोकरदन प्रतिनिधी(शेख सलिम) : रमजान ईद दोन -तीन दिवसांवर आली आहे .खरेदीसाठी बाजारपेठेत कापड दुकानासह सुकमेव्यांची दुकाने गर्दीने फुलली आहे.मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यात अत्यन्त कडक उपवास पाळेले जातात या महिन्यात सुका मेवा ,मिठाई, फळे, खजूर ,यांची मांगणि वाढते.शहरातील पोलिस्टेशन ते नगरपालिका समोर,सराफ मार्केट ,काझी मोहल्ला आदि ठिकाणी कापड दुकांनासह सुकमेव्यांची दुकाने थाटली आहे.सुका मेवामध्ये शेवया ,काजू ,बदाम ,मनुके, खोबरा, खारी ,अशी अनेक सुका मेवा खरिदी केली जाते.बाजारात कापड बाजार अशा विविध ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने सजली आहेत.रमजान ईद जवळ असल्याने सणाचे स्वागत करण्यासाठी मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्सह दिसून येत आहे.बाजारामध्ये नवीन कपड्यांसह चप्पल,बूट, सोंदर्य प्रसाधने, अत्तर , शेवया ,सुकामेवा, खरेदी साठी गर्दी झालेली आहे,रमजान ईदचे वैशिष्ट्य असलेल्या शिरखुर्म्यासाठी विविध प्रकाच्या शेवया खरेदी केल्या जात आहे. याशिवाय बदाम ,पिस्ता, काजू, खोबरा, विलायची ,मनुका, यांची जास्त प्रमाणात मांगणी आहे.आणि कपड्यांसाठी बच्चे कंपनीपासून अबालवृद्धांपर्यंत कपडे खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानात गर्दी वाढली आहे.ईदमुळे रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरु राहत आहेत,आणि तरुण वर्ग कपड्यांमध्ये रेडिमेड कपड्यांची जास्त प्रमाणात खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे.
(१)प्रतिक्रिया: जास्त करून रेडिमेड कपडे तीस वर्ष व्याचे ते लहान मुलांन पर्यंत माणसे हे रेडिमेड ड्रेसेस खरीदि करू लागले.त्यात जास्त करून जोकर पेंड,शेरवानी ,सक्रेच जीन्स पेंड, इत्यादी कापडला तरुणवर्गाची जास्त प्रमाणात मांग आहे .कापड विक्रेता : उस्मान सेठ.
(२)प्रतिक्रिया : रमजान महिन्यात जास्त करून ईदच्या दिवशी शूरखुर्मा बनवतात त्यासाठी मुस्लिम बांधव सुका मेव्याची खरिदी करतात .त्यात शेवया ,काजू ,अंजीर ,मनुके ,खोबरा, पिस्ता आदि सुकामेवाला मांग आहे .=सुकामेवा विक्रेता : अमान सिद्दीकी.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें