14 व्या वित्त आयोगामार्फत येणारा 3 टक्के निधी वाटप करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 जून 2018

14 व्या वित्त आयोगामार्फत येणारा 3 टक्के निधी वाटप करण्याची मागणी.

14 व्या वित्त आयोगामार्फत येणारा 3 टक्के निधी वाटप करण्याची मागणी.

भोकरदन तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना निधी तसाच आहे पडून गतशिक्षण अधिकारी डॉ.अरुण चौलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे नारायण लोखंडे यांची मागणी.


प्रतिनिधी- सोयगाव देवी
भोकरदन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत येणाऱ्या 14 व्या वित्त आयोगामार्फत दिव्यांगाना येणारा टक्के निधी दोन ते तीन वर्षापासून तसाच पडून आहे.सदरील निधी दिव्यांगाना वाटप करण्याचे आदेश दिलेले असून सुद्धा काही ग्रामपंचायती या शासन आदेशाचे पालन न करता दिव्यांगाच्या निधी वाटपाच्या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे.अनेक ग्रामपंचयतीमध्ये वेळोवेळी झालेल्या ग्रामसभामध्ये अपंग निधी वाटपाचे ठराव घेऊनसुद्धा निधीची वाटप न झाल्याने तालुक्यातील दिव्यांग नाराजी व्यक्त करत आहे.त्यामुळे तालुक्यातील बरंजळा लोखंडे तसेच बहुतांश ग्रामपंचायतीना गटविकास अधिकारी यांनी पत्र पाठवून निधी वाटप करण्याचे आदेश द्यावे व त्वरित निधी वाटप करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे,महेश लोखंडे,समाधान लोखंडे,संदिप भोकरे,दिपक जाधव,शेख रईस, जनार्धन लोखंडे, आदींनी केले.
प्रतिक्रिया- भोकरदन तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीत दोन ते तीन वर्षांपासून दिव्यांगाना येणारा निधी तसाच पडून असल्याने त्याचा फायदा दिव्यांगाना मिळू लागला नाही.निधी पडून असल्याने ग्रामसभेत ठराव मंजूर होऊन सुद्धा ग्रामपंचायती निधी वाटपास का टाळाटाळ करीत आहे ,अशी चर्चा दिव्यांगाना मध्ये असल्याने प्रशासनाबद्दल नाराजीचे वातावरण आहे.त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी त्वरित निधी वाटपाचे आदेश द्यावे नसता तालुक्यातील दिव्यांगाना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल.=नारायण लोखंडे- सामाजिक कार्यकर्ते - बरंजळा लोखंडे.

गटविकास अधिकारी यांना निवेदन देतांना नारायण लोखंडे, महेश लोखंडे आदी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें