अजिंठा परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ! शेतकऱ्यांचेडोळे अभाळाकडे:!
धुळ पेरणी वाया जाण्याची भिती !
अजिंठा: मुनीर पठाण:अजिंठा:सिल्लोड तालुक्यातील अजिंठासह परिसरात जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यानी मका पिकांची मोठया प्रमाणात धूळपेरणी केली आहे.
मात्र आता पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून धुळ पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अजिंठा परीसरात साडेतीन हजार हेक्टर पेरणी क्षेत्र असुन या क्षेत्रामध्ये मक्का पिक लागवडी (७०) टक्के पेरणी झालीआहे.
शेतकऱ्यांनी कसेबसे आर्थिक गणित जमवून मका,कापूस इतर बियाणांची जुळवा-जुळवी करुन पेरणी केली पण पेरणी केलेल्या बियाणांची उगवणच झाली नाही.
यामुळे परिसरात लागवड केलेली
महागडी बी-बियाणे धोक्यात आली आहेत.पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
______________________
" सिल्लोड तालुक्यात येत असलेल्या अजिंठा. येथे गेल्या मृग नक्षत्रात तुरळक पाऊस पडला. त्यानंतर आठवडाभरांनी १५ ते २० जून दरम्यानथोडाबहुत पाऊस पडला व आता पाऊस पडेल, या आशेने अजिंठा,आनाड, मुखपाट,बाळपूर , गोळेगाव खुर्द, पानवडोद, येथील शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची पेरणी करायला सुरुवात केली. असून कापूस,मिरची, ज्वारी, मुग,चवळी, उडीद, तुर, आदी पिकांची पेरणी केली आहे. दरम्यान जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी समानधारक पाऊस झाला नाही.पावसाअभावी शेतकऱ्यामध्ये चिंता पसरली आहे._________________________
"अजिंठा परिसरात सहा जुन ला अल्पश पाऊसाने हजरी लावली होती. " या परिसरातील बळीराजाने शेतीचे मशागती करून पेरणी लम्बाहुडा, निमारसोड, वारलेश , मुखपाठ अनाड,बाळापूर ,राजणी,अंधारी,
औजामाळ, दुधमाळ, आदी शिवारामध्ये मका पिकाची पेरणी शेतकऱ्यानी परिसरमध्ये जवळजवळ ७० टक्के पेरणी केली आहे. " गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग हा चिंतातूर झाला आहे."
_________________________
"शेख मसुद शेख हुसेन _ शेतकरी (गट क्र. ६३ ) आनाड शिवार-
मागील वर्षी शेतकरी हा बोडअळीच्या संकटात सापडला होता. त्या संकटातून कसेबसे उभारणी करून समाधान व्यक्त केले. त्या संकटातून सुटका करून ह्या वर्षी पाऊसाच्या संकटात शेतकरी सापडला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें