जिंतूरच्या प. स. कार्यालयाचा कारभार रामभरोसे-उपसभापती खिस्ते पाटील. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 जून 2018

जिंतूरच्या प. स. कार्यालयाचा कारभार रामभरोसे-उपसभापती खिस्ते पाटील.

जिंतूरच्या प. स. कार्यालयाचा कारभार रामभरोसे-उपसभापती खिस्ते पाटील.

कर्मचाऱ्याच्या गैरहजेरी मुळे विकास कामास खीळ.

गैरहजर कर्मचाऱ्याचा अहवाल वरिष्टना पाठवणार.

  जितूर (पठाण अजमत):
      सध्या पावसाळा सुरू झालेला असून शेतकऱ्याच्या कामाची लगबग सुरू झाली आहे सर्व सामान्य व विशेष करून शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा हा पंचायत समिती हे कार्यालय असते पण दुदैवाने या कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्या मुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची परवड होत असल्याची टीका पंचायत समिती उपाध्यक्ष विजय खिस्ते यांनी स्पष्ट केले
    आज पचायत समिती मध्ये मासिक बैठकीचे आयोजन होते सर्व विषया वर नियोजित बैठक असल्या मुळे सर्व सबधीत विंभागाचे कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक असणे गरजेचे असताना  मासिक बैठकीची पूर्वकल्पना असतानाही बहुतांशी कर्मचारी विविध विभाग प्रमुख नेहमी सात्यत्याने गैरहजर राहत असल्या मुळें विकासकामाचा खोळंबा झालेला असून सर्व सामान्य विविध योजनेचे लाभार्थी व शेतकरी बांधव कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष भेट होत नसल्या मुळे नाराजीचा सूर पचायत समिती मधील गैरहजर राहण्याऱ्या कर्मचाऱ्या विरोधात स्पष्ट उमटत आहे
    विशेष करून पशुसंवर्धन कृषी विभाग वनीकरण आदी विभागाचे विभाग प्रमुख नेहमी महत्वाच्या मासिक बैठकीस उपस्थित राहत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा वैतागला असल्याचे खंत उपसभापती विजय खिस्ते यांनी वयक्त केली
    सर्व गैरहजर कर्मचारी विभाग प्रमुख यांचा अहवाल बीडीओ सह जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देणार असल्याचे खिस्ते यांनी सागीतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें