सोनपेठयेथे बीजगोळे टाकून साजरा केला जागतिक पर्यावरण दिन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 जून 2018

सोनपेठयेथे बीजगोळे टाकून साजरा केला जागतिक पर्यावरण दिन.

सोनपेठयेथे बीजगोळे टाकून साजरा केला जागतिक पर्यावरण दिन.

वृक्षारोपण व संवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकासचा उपक्रम.

सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०६जून २०१८
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोनपेठ येथील तरुण, शिक्षक, पत्रकार यांनी एकत्र येऊन सोनपेठ बस स्थानक व तहसील कार्यालय येथे दि.०५जून रोजी वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक माणिकराव निलंगे, बस स्थानक व्यवस्थापक जमशेटे, प्रा.संतोष रनखांब, डॉ.दीपक काळे, वृक्षमित्र महेश जाधव, माऊली आदत (जिल्हासचिव), दत्तात्रय मोरे(पाथरी तालुकाध्यक्ष), विजय राजभोज (सोनपेठ तालुकाध्यक्ष), सुशील सोनवणे (सोनपेठ तालुका उपाध्यक्ष), पंडित राठोड, सुजीत शिंदे, सुजीत माळी, नितीन हारकाळ, प्रेम नवघरे, सोमेश्वर आरबाड, सुरेश आरबाड, सचिन शिरसाठ, वाघमारे मामा, पत्रकार राधेश्याम वर्मा, पत्रकार किरण स्वामी, पत्रकार गणेश सुरवसे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सोनपेठ रहिवाश्यांनी या लावलेल्या झाडांची काळजी घेण्याचे  आवाहनही या तरुणांनी केले आहे.
 तहसील कार्यालय येथील वृक्षारोपण प्रसंगी जीवराज डापकर तहसीलदार सोनपेठ, पत्रकार सुधीर बिंदु, मानिक केंद्रे, कृष्णा पिंगळे, सय्यद खदीर विटेकर, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें