साळवे बंधुचां झाला दादासाहेब फाळके जिवन प्रचार समितीकडुन गुणगौरव.
आश्वी (प्रतिनिधी)
चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या विचारांच्या बळावर ग्रामीण भागातून हृषीकेश वसंत साळवे व किरण सुरेश साळवे यांनी शेतकरी जीवनाची देवाक काळजी रे या गाण्यावरती शाॅर्ट फिल्म सादर केली आहे.या शाॅर्ट फिल्मची दखल दादासाहेब फाळके यांच्या परिवाराने घेतली असून या परीवाराने हृषीकेश वसंत साळवे व किरण सुरेश साळवे यांना फाळके परिवाराकडून दादासाहेब फाळके यांचे नातु मा.श्री चंद्रशेखर पुसाळकर यांच्या आदेशाने व इंटरनॅशनल काॅर्डीनेटर डॉ.सुधीर तारे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोल राखपसरे(पत्रकार) यांच्या हस्ते हृषीकेश वसंत साळवे व किरण सुरेश साळवे यांना इंटरनॅशनल दादासाहेब फाळके अॅवर्रनेस मिशन समितीने साळवे बंधुना सन्मानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी साळवे परिवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान, आशवी बु।। यांनी समाजात सन्मानपुर्वक सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व ग्रामस्थांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें