पाझर तलाव दुरुस्ती - सिमेंट बंधारा कामांचे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन ;
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 12/06/2018.जलयुक्त शिवार योजनांतर्गत ( जलसंधारण) पेंडगाव - तळणी - सावखेडा येथील पाझर तलाव दुरुस्ती - सिमेंट बंधारा कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
पेंडगाव येथील पाझर तलाव क्रमांक एक व दोनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच तळणी येथील पाझर तलाव दुरुस्ती व सावखेडा खु. - बु. येथील सिमेंट बंधारा कामांचे उदघाटन करण्यात आले असून ही कामे तात्काळ हाती घेण्यात येणार आहे.
पेंडगाव - तळणी - सावखेडा येथील परिसरातील पाझर तलाव दुरुस्ती - सिमेंट बंधारा कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,संजय मुरकुटे,रमेश पारखे,हरिरंग सुस्ते,बाबुराव अंभोरे,नामदेव सुस्ते,धनराज सितळकर,तुकाराम अंभोरे,रफिक देशमुख,रविंद्र राजपूत,शेनफड भालकर,ग्रामसेवक काळे,सुखदेव पारखे,कारभारी पारखे,बबन सुस्ते,शाम पारखे,दीपक अंभोरे,रहीमान शहा,काशिनाथ अंभोरे,संजय बन्सोड, इंजिनिअर सोनवणे,दांडगे,यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें