अल्पवयीन प्रेमीकेला शिर्डीत पकडले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 जून 2018

अल्पवयीन प्रेमीकेला शिर्डीत पकडले.

अल्पवयीन प्रेमीकेला शिर्डीत पकडले.


 शिर्डी प्रतिनिधी/ राजेंद्र दुनबळे.दि.11/06/2018.
 सावदा जिल्हा जळगाव येथील १६ वर्षीय मुलीस गावातीलच सुनिल रमेश तायडे २३वर्ष याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले.या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलिसांनी युवकाविरुद्ध कलम  ३३/२०१८/३६३, नुसार गुन्हा दाखल केला सावदा जिल्हा जळगाव येथील १६ वर्षीय मुलीस एकाने फूस लावून पळविल्याची घटना ४ जून रोजी घडली होती सावदा पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी सावदा जिल्हा जळगाव पोलिसांनी शोध पथकांची स्थापना करुन इतर ठिकाणी शोध घेण्यास पाठवली या बाबदची माहिती शिर्डी पोलिसांना कळवुन छायाचित्र पाठविण्यात आले व या तपास कामात सावदा पोलिसांनी मदत मागितली असता विभागीय पोलिस अधिकारी डाॅ.सागर पाटील यांनी तुम्हाला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन देऊन शिर्डी पोलिसांना सुचना व मार्गदर्शन करुन शोध घेण्यास सांगितले.शिर्डी पोलिस स्टेशनला नव्यानेच बदलून आलेले पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदिप दहिफळे.शोध पथकाचे.पो.ना.सचिन.बैसाणे,
पो,हे,काँ मंडलीक,यांनी छायाचित्रांच्या आधारे शहरात शोधाशोध केली असता पालखी रोड या ठिकाणी हे जोडपे फिरत आसल्याचे सचिन बैसाणे यांच्या नजर पडले क्षणाचाही विलंब न करता दोघांना पकडुन शिर्डी पोलिस स्टेशनला आणुन सावदा पोलिस स्टेशनचे पोउनि.गणेश आखाडे.बाळु मराठे यांच्या ताब्यात देण्यात आले याप्रकरणी पुढील तपास सावदा पोलिस हे करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें