पत्रकार संघाचा ही आमदार असावा यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन सादर होणार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 जून 2018

पत्रकार संघाचा ही आमदार असावा यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन सादर होणार.



अहमदनगर जि. प्रतिनिधी (अमोल राखपसरे)
      पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याबाबत आज महाराष्ट्र पत्रकार संघा तर्फे चर्चा करण्यात आली असून ज्याप्रमाने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांचे राखीव मतदार संघ आहेत, पदविधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधर मतदार संघ आहेत त्याच धर्तीवर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी "पत्रकारांचाही स्वतंत्र मतदार संघ असायला  पाहिजे" अशी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आग्रही मागणी करण्यात येत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.
पत्रकार स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वृतसंकलन करतोच शिवाय त्यांच्याही अनेक प्रलंबित व न्याय मागण्या आहेत.त्या सोडविण्यासाठी व प्रगल्भ लोकशाही निर्माण होण्यासाठी आणि पत्रकारांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा यासाठीच  पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ व्हावा ,यासाठी  येणा-या जुलै २०१८ पासुन सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याचे निवेदन  सर्वत्र लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास कोळेकर व पदाधिकाऱ्यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें