सिल्लोड शहरातील यशवंतनगर येथे नविन ट्रान्सफर्मारचे लोकार्पण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 जून 2018

सिल्लोड शहरातील यशवंतनगर येथे नविन ट्रान्सफर्मारचे लोकार्पण.



सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२९ ) -
सिल्लोड शहरातील शासकीय घरकुल योजनेतील नागरीवसाहत यशवंत नगर मध्ये घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने विजेचा वापरही अधिक होऊन गेल्याने परिसरात असलेली विजेचे ट्रान्सफर्मार वेळो वेळी सतत जळून जात त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. नगर परिषदेने परिसरातील नागरीकांची गरज लक्षात घेऊन तातडीने वीज महावितरण कंपनीने नविन डि.पी.संच बसविण्याची तसदी घेतली या बसविण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफर्मारचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
नविन डि.पी.संच बसविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नविन डि.पी.संचचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,वमाजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, मनोज झवर, अमित आरके, गणेश डकले, राधेश्याम अग्रवाल, फईम पठाण, विलास कुदळ, महादू दुधे, महादू गुंजाळ, हारुण शहा आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें