अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचीत्त साधुन योग दिन साजरा व गुणवंत विध्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा संपन्न.
सेलू , दि.२१ रोजी येथील सॅनरो एज्युकेअर प्रा.लि. च्या क्युरीअस किड्स प्री स्कुल च्या भव्य दिव्य अशा नुतन ईमारतीचा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.बबनरावजी लोणीकर यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जि.प.गटनेते मा.रामनाना खराबे, जि.प. सदस्स मा.राजेंद्र काका लहाने, गुलाबराव लाटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष सॅनरो एज्युकेअर प्रा.लि. चे चेअरमण तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजय रोडगे हे होते तर व्यासपीठावर संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.रामराव रोडगे, सॅनरो एजुकेअर प्रा लि. चे डायरेक्टर आदित्य रोडगे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे प्राचार्या वर्षा स्वरूप आदि मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी योग दिनाचे औचीत्य साधून सर्व मान्यवरांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे मगर सर व किशोर घडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.कार्यक्रमाची सुरवात सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. संनरो एज्युकेअर प्रा.ली. चेअरमण तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते मा.ना.बबनराव लोणीकर साहेबांचे पुष्पहार,शाल व सृम्ती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले,तसेच क्युरीअस किड्स प्री-प्रायमरी स्कुलच्या चिमुरड्या विध्यार्थ्याच्या हस्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ व सृम्ती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.मा.ना. बबनराव लोणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “श्रीराम प्रतिष्ठान ही अल्प काळात शिक्षण क्षेत्रात नावरूपाला आलेली उत्कृष्ट दर्जाची शैक्षणिक संस्था असून डॉ.संजय रोडगे यांनी फिंडलन येथे जाऊन तेथील शिकवत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून सेलू सारख्या छोटयाशा शहरात त्याच्या संस्थेत फिंडलन येथील आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर करून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यास सुरवात केली आहे क्युरीअस किड्स प्री स्कुल हे त्याचेच एक फलित आहे असे गौरौउदगार काढले व डॉ.संजय रोडगे व त्याच्या या संस्थेला सोबत घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण प्रणालीत या उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षण पद्धतिची नक्कीच मदत घेऊ असे आवर्जून सांगितले डॉ.संजय रोडगे हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून विध्यार्थ्यांना व पालकांना शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या नवीन संधी उपलब्ध करून देत असतात त्याच्या या नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या व या संस्थेस शासनाकडून शक्य तेवढे सहकार्य करील असे आश्वासन दिले.”याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते क्युरीअस किड्स प्री स्कुलच्या अभ्यासक्रमातील पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.गतवर्षी प्रमाणे याही वर्षी रॉयल प्रिन्स अकॅडेमी सी.बी.एस.ई.या शाळेने आपली दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपल्या यशाची परंपरा कायम राखत १० वी सी.बी.एस.ई.चा १०० %निकाल लावला.या कार्यक्रमाचे औचीत्य साधून सेलू तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विध्यार्थ्यांचा मा.ना.बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सृम्ती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात एरो मोद्लिंग च्या सहायाने विमान ऊडाणाचा कार्यक्रम घेतला तसेच लहान मुलासाठी बोलक्या बहुल्याचा व जादूचा कार्यक्रम घेउन चिमुरड्या विध्यार्थ्याचा आनंद द्विगुणीत केला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या डॉ.मधुबाला बोराडे यांनी केले सूत्रसंचलन अवधूत लीपने यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी क्युरीअस किड्स प्री-प्रायमरी स्कुल शिक्षक व श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचारी वृदानी परीश्रम घेतले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें