महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 जून 2018

महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा.

महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा.

शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी नियमित योगासने करने गरजेचे-प्रा.जायभाये.

सोनपेठ (राजेश खेडकर)दि.२१जून २०१८
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यायाच्या प्रांगणात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात जिवराज डापकर, तहसीलदार सोनपेठ व शौकत पठाण, गट शिक्षणाधिकारी सोनपेठ यांच्याहस्ते प्रतिमा पुजनाने झाली. प्रमुख मार्गदर्शक प्रा.विठ्ठल जायभाये व मोहनराव चौलवार यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांना योगासन व प्राणायामाचे फायदे सांगत व प्रात्यक्षीक करून दाखवत योगासन करून घेतले. उपक्रमाच्या प्रारंभी योग दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करांना प्रा. जायभाये यांनी "शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी नियमित योगासने करने गरजेचे आहे. रोग निवारणाच्या या पद्धतीस जगातील असंख्य देशांनी स्विकारले असून योगास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. २१जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो; म्हणुन आजच्या दिवसी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
श्री महालिंगेश्वर विद्यालयात साजरा करण्यात आलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात  महालिंगेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील जि.प.प्रशाळा, जि.प.केंद्रीय कन्या शाळा, जि.प.प्रा.शा. सोनपेठ, जि.प.प्रा.शा.सोनखेड, जि.प.प्रा.शा.सोनखेड तांडा,  जि.प.प्रा.शा.दहीखेड, मुक्तेश्वर विद्यालय सोनपेठ आदी शाळेतील विद्यार्थ्यांसह संबंधीत शाळेचे शाळाप्रमुख, शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, तालूका क्रिडा अधिकारी सुमीत लांडे, केंद्र प्रमुख गणपत कोटलवार, नागनाथ कोटुळे, ज्ञानेश्वर डमढेरे, पत्रकार किरन स्वामी, पालक सहभागी झाले होते. शेवटी मुख्याध्यापक पी.एल.जोशी यांनी उपस्थित मान्यवर व योग प्रशिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें