सिमेंट रोड, नाल्या बांधण्याच्या मागणीला वेग, एकिकडे भोकरदन शहराला स्वच्छते बाबतीत देशात ५५ वा क्रमांक मिळाला आहे आणि दुसरी कडे मुस्लिम वस्त्यांमध्ये विकासकामे रखडली, त्यामुळे रफिक कॉलनी च्या नागरिकांमध्ये भोकरदन नगरपरिषदे विरुद्ध तीव्र नाराजीचे वातावरण,
प्रतिनिधी.शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : शहरातील रफिक कॉलनीतील वॉर्डात अनेक महिन्या पासून दुर्गंधी
नगरपरिषदेच्या निवडणूक होऊन दिड ते पावणे दोन वर्षे झाली तरी भोकरदन येथील प्रभाग क्र. ५ रफिक कॉलनी चा काहीही विकास झाला नाही, अनेक वेळा निवेदन देण्यात आली, जिल्हाधिकारींना सुद्धा निवेदन देण्यात आले, अनेक वेळा तोंडी सांगण्यात आले, नगराध्यक्षांकडून वारंवार स्वत पाहणी केल्या गेल्या तरी सुद्धा भोकरदन नगरपरिषदेला जाग आली नाही, पावसाच्या वेळी रस्त्याची व मोकळ्या नाल्याची अत्यंत दुरावस्था होते, मागच्या आठवड्यात सुद्धा मौसमी पावसाची सुरुवात झाली आणि आठवड्या भरात रफिक कॉलनी च्या रस्ते व नाल्याची गंभीर दुर्दशा झाली त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आणि त्यामुळे आज भोकरदन येथील प्रभाग क्र. ५ रफिक कॉलनी येथील नागरिकांनी आज दि. २५-०६-२०१८ ला दुपारी दोन वाजता भोकरदन नगरपरिषद चे नगराध्यक्षांचे पती सह उपाध्यक्ष व नगरसेवकांचा घेराव करुन रफिक कॉलनी च्या मुलभूत सुविधा/ रस्ते, सिमेंट रोड, नाल्या संबंधी कामा बद्दल विचारले आणि आश्वासने नव्हे तर विकासाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली, नगराध्यक्षांचे पती माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, यांनी रफिक कॉलनी च्या नागरिकांना सांगितले की आम्ही रफिक कॉलनी च्या रस्त्याचे व नाल्याचे पुर्ण स्टुमेडस तय्यार केलेला आहे आणि आम्ही उद्या पासून रस्ते आणि नाल्या बांधण्याच्या कामाची सुरुवात करणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतले, अता हे बघायचे आहे की केव्हा विविध विकास कामांची नक्की सुरुवात होते. या वेळी उपाध्यक्ष इरफान सिद्दीकी, हम्दु चाऊश, नगरसेवक शेख कदीर,जफर सेठ ,रमेश जाधव , रफिक कॉलनी चे नागरिक शेख अजमत कुरेशी, शेख अफसर चौधरी,समाजसेवक अमजद पठान,अजीम भाई, शेख नदिम, शेख सलमान, रहिम कादरी, अश्फाक कुरेशी, नसीर खाँ,फाजील कुरेशी, समीर काझी, करीम कादरी ,शेख माजेद , सलीम भाई ,शेख सलमान ,शेख असलम , सहित अनेक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें