जिंतूर शहरात गुटखा विक्रीची तस्करी जोरात सुरु-गुटखा बंदि कागदावर.अंधडा दडतो कुत्रा खातो असाप्रशासनाचा सोंग.
जिंतूर:(पठाण अजमत)जिंतूर शहरात व परिसरात गुटखा माफिया सर्रासपणे प्रचंड प्रमाणात गुटखा विक्रीचा गोरखधंदा करून बेकायदेशीर धंदा करत महिन्यात कोटयवधी रूपयांची उलाढाल करून स्वतः च्या तुंबड्या भरून मालामाल होत असून सद्यस्थितीत शहरासह तालुक्यातील प्रत्येक छोटे मोठे दुकानात खुलेआमपने तस्करी सुरु आहे. परिणामी शहरात गुटखा माफियाचा बोलबाला आहे.मात्र तरीही या प्रकरणा कडे अन्न व औषध भेसळ प्रशासन,पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहे.
केंद्र व राज्य शासनाने नागरिक गुटखा व मावा पूडीच्या वीक्री व उत्पादनावर बंदी घालण्यात आली असून ही शहरासह तालुक्यात खुलेआमपने विक्री चालू आहे. शाळा ,बस्थानक, शासकीय निम शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, या कार्यालय च्या शेजारी ही विक्री खूलेआम पने सुरु असून हे कर्मचारी हि सेवन करतात. शासनाची गुटखा बंदी हि नुस्ती बोलण्यासाठी उरली आहे. तालुक्यात ईतर राज्यातून आयात होत आहे. शहरातील एक गुटखा किंग हा पूर्ण तालुक्यातील फेरीवाले, गुटखा विक्रेते, टपरी वाल्यांना होलसेल दराने विक्री करतो. आज रोजी शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल चालू आहे. यावर प्रशासन, पोलीस प्रशासन कधी लक्ष देनार का? किंवा तेही झोपेचा सोंग घेनार.अशी चर्चा आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें