सोनपेठ शहर व परिसरात पावसाची हजेरी.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०२जून २०१८वळवाच्या पावसाने काल मध्यरात्री सोनपेठ शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. यामुळे उष्णतेत घट झाली असुन वातावरणात कांहीसा गारवा अनुभवन्यात आला. मात्र मध्यरात्री अचानक आलेल्या या पावसामुळे सोनपेठ शहराच्या कांही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असुन वृत्त लिहीपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. पहिल्याच पावसाने विद्युत पुरवठ्याचे हे हाल तर भर पावसाळ्यात काय होईल, अशी चर्चा होताना दिसत असुन; संबंधीत विभागाने याबाबत वेळीच ऊपाय योजना करून भविष्यात निर्माण होनाऱ्या समस्या सोडवाव्यात असेही नागरीकांतून बोलल्या जात आहे.
वळवाच्या या पावसामुळे विट भट्ट्यावाल्यांची सुद्धा धावपळ झाली.
या पावसामुळे आगामी मृग नक्षत्रात पडनाऱ्या पावसा बाबत आशा पल्लवित झाल्या असून. पावसाळ्यात चांगला पाऊस व्हावा जेनेकरून बळीराजा मागचे दुष्काळाचे दुष्टचक्र संकट टळेल अशी भावना शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें