सेलु तालुक्यातील वालूर येथील मागिल आनेक महिण्या पासुन शौचालयाच्या अनुदाना पासून लाभधारक वंचित ....
सेलू प्रतिनिधि.समशेर खान.दि.16/06/20018.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 12 हजार रुपेय अनुदान असलेल शौचालयाचे बिल बांधकाम पूर्ण होऊन ही मिळाले नसल्याने गावातील संतप्त लाभधारकानी तहसीलदार .गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले .
वालूर येथील महाराष्ट रोजगार हमीयोजने तून पँनल तांत्रिक अधिकारी यानी दिलेल्या
मार्कआऊट प्रमाणे शौचालय बांधकाम पूर्ण व अंतिम केले आहे.परंतु बांधकाम होऊन गेल्या 7 महिने पूर्ण झाले असून
सुधा बांधकामचे एक ही बिल मिळाले नाही .अनेक वेळस ग्रामविकास अधिकारी व संमाधीत अधिकारशी बांधकामची महिती देऊन हि एक ही बिल दिले नाही .बांधकामासाठी लागणारे वाळू .सिमेंट .विटी साठी लाभधारकांना घरातील धान्य विकुण बांधकाम पूर्ण करावे लागले .यामुळे लाभधारकांना उपास मारीची वेळ आली आहे ..यामुळे संतप्त लाभधारकांनी बिल मागणी तत्काळ केली असून बिल न दिल्यास गटविकास अधिकारी पंचायत समिती सेलू कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल असे निवेदन दिले आहे..निवेदनावर सखाराम संगेवार .रमेश आबंटवार .सुदाम अरे .अनूसया एट्वार .वाल्मिक चेन्डे .शिवलिंग खेरडकर.गंगाधर सावंत .गावातील प्रतीष्ठीत नागरिक चंद्रकांत चौधरी.भगवान खपले आदी नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहे .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें