सेलूत ईद उत्साहत व आनंदानत साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

सेलूत ईद उत्साहत व आनंदानत साजरी.

सेलूत ईद उत्साहत व आनंदानत साजरी.

सेलू/प्रतिनिधी :-- शहरात रमजान ईद उत्साहात साजरी  करण्यात आली.
मुस्लीम बांधवामध्ये रमजान महीन्या मध्ये तीस दिवस उपवास ठेवल्या जातात तसेच संपूर्ण महीना भर तराविची नमाज, पडतात व कुराण पठन करुन व विविध धार्मिक कार्यक्रम या पविञ महीण्यात चालतात व तीस दिवस उपावासा नंतर रमजान ईद साजरी करण्यात येते. हा सण म्हणजे सर्वात मोठा सण मानला जातो. या पविञ महीण्यात पुर्ण जगातील मुस्लीम बांधव उपवास ठेवतात  त्या नंतर संपुर्ण जगात ईद उल फिञ हर्ष व उल्लास ने हा सण साजरा करतात, हा सण साजरा करण्यासाठी मुस्लीम बांधव ईदगाह मैदानात नमाज अदा करण्यासाठी एका जागेवर जमा होऊन नमाज अदा करुन, सर्वांच्या व इतर समाजाठी लोक-कल्याणा साठी दुआ करतात.
सेलू येथे रमजान ईद उत्साहाने आणि शांतेतेत पार पडला. शहरातील सर्व मुस्लीम समाजातील सर्व नागरीक, तरुण, लहाण, वयोवृध्द, ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी वेळेवर सामील झाले होते. सर्व या वेळी अल्लाह चा दिलेला संदेश ऐकण्यात मग्न होती, ईदच्या नमाज नंतर देशाच्या प्रगतीसाठी व सर्व बांधवांच्या सुरक्षीतेसाठी दुआ करण्यात आली, तसेच विषेश पाऊसा साठी दुआ करण्यात आली असुन नमाज नंतर एकमेकांना गळाभेट करुन ईद निमित्त शुभेच्छा देवान घेवान दिवस भर चालत राहल्या या ईद निमित्त ईदगाह मैदानात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.  मुस्लिम बांधवाना भेटी व शुभेच्छा देण्या करीता विविध समाजातील लोक व पक्षातील पदाधिकारी ईदगाह मैदानात सामिल झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें