सेलु येथे रविवारी मिरगाच्या कविता या कवी संमेलनाचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 जून 2018

सेलु येथे रविवारी मिरगाच्या कविता या कवी संमेलनाचे आयोजन.

सेलु येथे रविवारी मिरगाच्या कविता या कवी संमेलनाचे आयोजन.


सेलू : येथील सेलू नागरी सहकारी पतसंस्था म सेलू आणि शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रविवार दि.१७ रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात सायंकाळी ०६ वाजता मिरगाच्या कविता या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद् घाटन श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष विनोदराव बोराडे असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने,उपशिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) विठ्ठल भुसारे,कादंबरीकार भारत काळे,कवी डॉ.केशव खटींग यांची उपस्थिती राहिल. मिरगाच्या कविता या कवी संमेलनाचे हे सहावे वर्ष असून या काव्य मैफलीत सिनेगीतकार विष्णू थोरे ( नाशिक ), अण्णा जगताप ( हिंगोली ), अमृत तेलंग ( नांदेड ), गीता देव्हारे- रायपुरे ( चंद्रपुर ), स्वाती बंगाळे ( नागपूर ) यांचा सहभाग असेल. कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें