डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गाय दगावली सेलू तालुक्यातील डासाळा येथील प्रकार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 जून 2018

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गाय दगावली सेलू तालुक्यातील डासाळा येथील प्रकार.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गाय दगावली सेलू तालुक्यातील डासाळा येथील प्रकार.


सेलू प्रतिनिधी

तालुक्यातील डासाळा येथील पशुधन कार्यालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गायीला साप चावल्यामुळे दगावल्याची तक्रार डासाळा येथील रहिवासी सिद्धेश्वर रामेश्वर गजमल यांनी पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत माहिती याप्रमाणे गाईला साप चावल्यामुळे 12 जून रोजी गाय अत्यवस्थ झालेली होती येथील पशुधन कार्यालयात गावकरी जाऊन आले असता तेथील कार्यरत असलेले डॉक्टर हजर नसल्यामुळे व त्यांना मोबाईल संपर्क साधला असता त्या सेलू येथील कार्यालयीन काम करत असल्याचे सांगून मी डासाळा येथे येऊ शकत नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले सदर काम थोड्या वेळानंतर करा अगोदर माझ्या गाईचा इलाज करा अशी गयावया व विनंत्या वारंवार करत असून देखील सदर डॉक्टरांनी एकही न ऐकता परिणामी थोड्या वेळानंतर दुभती गाय दगावली दवाखान्यात जर डॉक्टर वेळीच उपस्थित असले असते तर गाडीचा प्राण वाचला असता पण डॉक्टरांना दवाखाना सोडून कार्यालयातील काम महत्त्वाचे असल्यामुळे डासाळा येथील सिद्धेश्वर गजमल यांची गाय  दगावली डासाळा येथील डॉक्टर नेहमीच हलगर्जीपणा दाखवतात वतीने नेहमी सेलू येथील कार्यालयात काम आहे असे सांगून गावकऱ्यांची कामे टाळतात त्यामुळे गावातील इतर पशूंच्या बाबतीतही असेच घडत असते त्यामुळे नाइलाजास्तव खाजगी डॉक्टर बोलवावे लागतात व ते खाजगी डॉक्टर गरीब शेतकऱ्याकडून अडून पैसे घेऊन शेतकऱ्याची काम करतात डासाळा येथील पशु दवाखाना  शोभेची वस्तू बनला आहे  असेच म्हणावे लागेल आशा निर्दयी व कामात हलगर्जी करणाऱ्या पशु अधिकाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सिद्धेश्वर रमेश राव गजमल कैलास रमेश राव गजमल बालाजी शिवाजीराव गजमल यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
वार्षिक अहवालासाठी सेलू कार्यालयात होते....... डॉक्टर v.b. गाय गोधने
वार्षिक प्रशासन अहवाल सादर करण्यासाठी सेलू येथील कार्यालयात हजर असताना 12 जून 2018 रोजी पशुवैद्यकीय दवाखाना डासाळा येथे सध्या कार्यरत आहे मला परिचर नसल्यामुळे सेलू  येथील  कार्यालयीन कामामुळे मी पण वेळीच पोहोचू शकले नाही व मी वार्षिक प्रशासन अहवाल देत असल्यामुळे वेळेवर येऊ शकले नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें