काँग्रेसचे नेते गणेश मामा दाैड चाैकाचे अनावरण.
सिल्लाेड ( संतोष लहाने )
काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते गणेश मामा दाैड यांच्या स्मरनार्थ सिल्लाेड येथील तहसिल कार्यालयासमाेर स्वर्गीय गणेश मामा दौड चाैकाचे नामकरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.गणेशमामा यांच्या निधनाने पक्षाची माेठी हानी झाल्याचे आमदार सत्तार यावेळी म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष गणेश दाैड यांचे शुक्रवार(दि0 १)रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.गणेशमामा दौड २० वर्षापासून काँग्रेसमधे सक्रीय काम करीत हाेते.तालुका अध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये जनसामान्यांना जाेडून पक्षाची संघटनात्मक बाजु भक्कम केली.अनेक निवडणुका त्यांनी काँग्रेसला जिकुंन दिल्या.त्यांच्या अकस्मात जान्याने पक्षाची मुलुख मैदान ताेफ निघुन गेल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,उपनगराध्यक्षा शंकुतलाबाई बनसाेड,दुर्गाबाई पवार,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवीदास लाेखंडे,बाजार समीतीचे सभापती रामदास पाटील पालाेदकर,माजी सभापती विजय आबा दाैड, प्रा.मन्सूर कादरी, उपसभापती नंदकिशोर सहारे,नगरपालीकेचे मुख्याधिकारी अशाेक कायंदे, दत्ता शेजुळ,राजेंद्र शेजुळ,बाजार समीतीचे संचालक दामाेधर गव्हाणे,नरसिंगराव चव्हाण,सतीश ताठे, शांतिलाल अग्रवाल,शंकरराव खांडवे,सत्तार हुसैन,विठ्ठलराव सपकाळ,माेहमंद इसाक,
राजु गाैर,रईस मुजावर पठाण ,कैसर आझाद,सुनिल दुधे,शेख बाबर,मनाेज झंवर,राजरत्न निकम,सलीम हुसैन,संजय मुरकुटे,अब्दुल हमीद,समाधान साळवे,लक्ष्मण कल्याणकर,शंकर नरवाडे, राजू साठे,मानसिंग राजपुत,मधुकर बेंडाळे,मतीन देशमुख,अमीत आरके,संजय आरके,अब्दुल बासीत,रुद्राजी नाईक,फईम पठाण, मनाेहर आरके,रवी आरके, आदींची यावेळी उपस्थीती हाेती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें