नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याकडून ईदगाह परिसराची पाहणी ;
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि 13सिल्लोड येथील ईदगाह परिसराची नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी पाहणी केली.
पवित्र रमजान ईद सनानिमित्त सिल्लोड येथील मुस्लिम समाजबांधव ईदगाह येथे नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देतात.हजारो मुस्लिम समाजबांधवांची या ठिकाणी गर्दी असते.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी ईदगाह परिसराची पाहणी करून पाणी व्यवस्था - विद्युत रोषणाई तसेच ठिक ठिकाणी कच टाकण्याबरोबरच परिसर स्वच्छतेविषयी नगरपरिषद कर्मचारी - अधिका-यांना आदेशीत केले .
ईदगाह परिसराची पाहणी करण्यात आली यावेळी
माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,सलिम हुसैन, विठ्ठलराव सपकाळ,रऊफ बागवान,राजरत्न निकम, रईस मुजावर पठाण,मुश्ताक बापु देशमुख,मनोहर आरके, नगरपरिषद उपमुख्याधिकारी ए.एम.पठाण, गोराडे,पाथ्रीकर,अब्दुल बासित,भावराव दुधे,फईम पठाण,जगन्नाथ कुदळ, आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें