सोनपेठ(राजेश खेडकर) दी. २३जून २०१८
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीच्या पहिल्याच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील यांनी प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्याकडे ग्रंथभेट देऊन ग्रंथ वाचन चळवळीच्या *ग्रंथदान* ऊपक्रमाची चांगली सुरुवात कूली आहे.
आजच्या या कार्यक्रमासाठी भगवानराव किरवले यांची विशेषउपस्थिती होती.
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येतात. याचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील यांनी वनस्पतीशास्त्र विषयाचे पाच ग्रंथ ग्रंथालयास भेट दिले. ही भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, ग्रंथपाल प्रा. अनंत सरकाळे यांच्याकडे दिली. यावेळी पाहूणे म्हणून भगवानराव किरवले उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रंथवाचन चळवळ सोनपेठचे अध्यक्ष राजेश खेडकर, प्रा. डॉ. मारोती कच्छवे, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. गोविंद वाकणकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें