सेलु येथे ईदच्या शुभेच्छा मंच परिसरात राडा,डॉ. रोडगेंच्या संयमामुळे टळला अनुचित प्रकार.
पालिका कक्ष अधिकारी राठोड व चालक जाधव यांच्यात वाद.
सेलू :प्रतिनिधी.समशेर खान.
ईदच्या निमितत्याचे औचित्य साधून नेहमी प्रमाणे नगरपालिका राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांच्यावतीने मुस्लिम बांधवास शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदान ते नूतन रोडच्या रस्त्यावर विविध मंच उभारण्यात येतात. मुस्लिम बांधवांना त्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या नगर पालिकेच्या मंचाजवळ नगर पालिकेचे कक्ष अधिकारी सुदाम राठोड व डॉ. संजय रोडगे यांच्या वाहनाचे चालक बाळू जाधव यांच्यात वाद उफाळला ही घटना रविवार दिनांक 16 जून रोजी घडली. याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे चालक जाधव व राठोड यांच्यात अपघात झालेल्या गाडीच्या पैश्यावर वाद सुरू होता. पालिकेच्या स्वागत मंचाजवळपास राठोड यांना पहाताच त्यात भर पडली. घटनास्थळा पासून स्वागत स्वीकारून मुस्लीम बांधव गेल्यानंतर चालक जाधव यांनी पैश्याची केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले. डॉ.संजय रोडगे यांचे याच परिसरात रुग्णालय आहे. नगरपालिकेचे कक्ष अधिकारी सुदाम राठोड व त्यांचे सहकारी तिकडे गेले. परंतु घडला प्रकरणाची वस्तुस्थिती डॉक्टर रोडगे यांना माहीत असल्याने आणि त्यांनी घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हे प्रकरण निवळले परंतु ईदच्या मंचाच्या परिसरात वाद उफाळल्याने नेमका काय प्रकार आहे. हे समजे पर्यंत एकच गोंधळ उडाला होता. डॉ. संजय रोडगे यांच्या मालकीच्या असलेल्या फॉर्च्यूनर या गाडीस साधारणता दीड- दोन महिन्यापूर्वी लक्कडकोट परिसरात उभ्या असलेल्या या गाडीस मागच्या बाजूस राठोड यांच्या भाच्याने दुचाकीने धडक दिली होती. यामध्ये गाडीचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. धडक मारणाऱा तरुण परिचित असल्यामुळे व त्याने गयावया केल्यामुळे. तसेच नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे मान्य केले म्हणून हे प्रकरण विकोपाला गेले नाही. परंतु घटना घडल्यापासून नुकसान भरपाई देण्याचे न.प.चे कक्ष अधिकारी राठोड यांनी मान्य केले. असताना देखील रक्कम दिली नाही. आणि संपर्कही केला नाही. म्हणून डॉक्टर रोडगे यांचे चालक बाळू जाधव बेचैन होता. ईदच्या दिवशी पालिकेच्या मंचावर राठोड दिसल्यानंतर आतापर्यंत राठोड यांनी केलेल्या चालाखीची आठवण चालक जाधव यास झाली.
आणि त्याने पैस्या बाबत विचारणा केली असता उभयतात वाद झाला. हे प्रकरण डॉ.
रोडगे यांच्या पर्यंत गेले ईदच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देऊन झाल्यानंतर आणि अखेरच्या क्षणी हा गोंधळ सुरू होता परंतु डॉ. संजय रोडगे यांनीच समयसूचकतेचे भान ठेवून संयम दाखविल्यामुळे हे प्रकरण निवळले. घडल्या प्रकाराची उभयता कडून पोलिसात मात्र तक्रार देण्यात आली नाही. उभयतांमध्ये राडा होऊन देखील डॉ. रोडगे यांनी दाखविलेल्या संयमामुळे अनुचित प्रकार घडला नसला तरी पण शनिवारी व रविवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा शहरात होत होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें