वालुर येथील जिल्हा परिषद( ऊर्दु) प्रा.शाळा पहिल्याच दिवशी,महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटना व ग्रामस्थांनी घातले कुलूप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 जून 2018

वालुर येथील जिल्हा परिषद( ऊर्दु) प्रा.शाळा पहिल्याच दिवशी,महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटना व ग्रामस्थांनी घातले कुलूप.

वालुर येथील जिल्हा परिषद( ऊर्दु) प्रा.शाळा पहिल्याच दिवशी,महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटना व ग्रामस्थांनी घातले कुलूप.


प्रतिनिधी.वालुर.दि.18/06/2018.
परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातल्या मौजे वालुर येथील ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. शाळेतील सहशिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी करीत शाळा बंद केली गेली.मौजे वालुर येथे 10 पदे माण्य असताना या ठिकानी फक्त 6 शिक्षक कार्यरत होते.या पैकि चार शिक्षकाची ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये चार शिक्षकाची यांची बदली झाली.
    या संबधि वालुर येथील शिक्षकाची शाळेतील रिक्त पदे भरण्या संबधिचे निवेदन महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान सेलु तालुका कमिटिच्या वतीने एका निवेदनाद्वारे दि.06/06/2018.रोजी अर्ज दिले होते कि 18/06/2018.स.10 वाजे पर्यंत समानिकरण पद्धतीने वालुर येथील पदे भरण्याची मागणी  मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी यांना दिले होते न भरल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा ईशारा दिला होता.संबधित अधिकारी यांनी या प्रकरणी दखल न घेतल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी mmyp संघटना व  ग्रामस्थांनी थेट शाळेला कुलूप ठोकले.  जिल्ह्यात सर्वत्र शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत असताना वालुर येथे मात्र थेट पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें