दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण, एक गंभीर जखमी.
सेलू-वालुर रस्त्यावरील राजवाडी कॅनाॅल जवळील घटना.
सेलू! प्रतिनिधी.समशेर खान.
तालुक्यातील राजवाडी येथील लोअर दुधना प्रकल्पाच्या कॅनॉल जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला असून त्यास परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हि घटना शुक्रवार दि. ८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडलीआहे.
या बाबतची माहिती याप्रमाणे ज्ञानेश्वर रंगनाथ हारके वय ३५ हे आपल्या दुचाकी एम.एच. २२ डब्ल्यू ८१६२ वरून सेलू हुन कुपटा येथे जात होते तर याच रस्त्यावरून वालूर येथून दुचाकीवर धामनगाव येथील गजानन शिवाजी डख एम.एच.३०ए.बी. १३९० वरून येत होते. या दोन्ही दुचाकीत समोरासमोर धडक झाल्याने ज्ञानेश्वर हारके हे जागीच ठार झाले. तर गजानन डख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. तर अपघातात ठार झालेल्या ज्ञानेश्वर रंगनाथ हारके यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन नंतर प्रेतावर मुळ गावी कुपटा येथील स्मशानभूमीत शनिवार दि. ९ जुन रोजी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेचा सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीट जमादार सुदाम शेलार हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें