वालुर येथील वार्ड 5 मधिल अर्धवट पाईपलाईन पंधरा दिवसात पुर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा ईशारा.
MMYP संघटनेच्या वतिने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन.
प्रतिनिधी.वालुर.
सेलु तालुक्यातील वालुर हे सर्वात मोठे गाव असुन या ठिकानी सामान्य मानसावा मुलभुत सुविधा पुर्णपने कधीच मिळालेली नाहि त्याचे एक कारण हे कि या ठिकानी मागील 25 वर्षापासुन एक हाती सत्ता आहे,जो नागरीत मुलभुत सुविधेची मागनी करेल त्यालाच विरोधक संबोधले जाते व खास करुन त्यालाच मुलभुत सुविधे पासुन वंचित ठेवण्याची परंपरा या ठिकानी चालु आहे.
आसाच प्रकार वार्ड 5 मधे सुध्दा चालु आहे,मागील तीन ते चार वर्षानी या ठिकानी नळाला पाणी येत नव्हते म्हणुन येथील सामाजिक कार्यकर्ते अनवर पठान यांनी वारंवार ग्रामपंचायत व ईतर ठिकानी यांची तक्रार केली.
याच प्रकरणाची तक्रार दि.06/01/2018.रोजी मा.गटविकास अधिकारी पं.स.यांना केली व तक्रारीत स्पष्ट केले कि जर या प्रकरणी लवकरात लवकर पाईपलाईन कार्यवाहि न झाल्यास ग्रामपंचायत वालुरला ताळा ठोकण्याचा ईशारा देलता याची ग्रामपंचायत वालुरने तात्पुर्ती दखल घेतली व या ठिकानी पाईपलाईन टाकली परंतु ती अर्धवट टाकण्यात आली आहे.
निवेदनात हे सुध्दा नमुद केले आहे कि,ग्रामपंचायतने जानुन बुजुन फक्त विशिष्ट व्यक्तीला या मुलभुत सुविधे पासुन वंचित ठेनण्याचे काम केले असुन हा लोकशाहिला कलंक असुन सरपंच व ग्रामसेवक एक प्रकारे हुकुमशाहि करण्याचे काम करीत आहे.संबधितावर योग्य ती कार्यवाहि करावी,या ठिकानची अर्धवट पाईपलाईल पंधरा दिवसात पुर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा ईशारा महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिषठानचे सेलु तालुकाध्यक्ष अनवर दिलावर पठान यांनी दि.06/06/2018 रोजी.जि.प.मुख्यकार्यकारी आधिकारी यांना दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें