जिल्हाधिकाऱ्यांनी पकडली पोकलेनसाह वाळू वाहतुकीची १५ वाहने.
सोनपेठ पोलिस ठाण्याला आले गॅरेजचे स्वरूप.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०३जून २०१८
सोनपेठ व पाथरी तालुक्याच्या हद्दीतील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध व नियमबाह्य, अवजड वाहनातून वाळू उपसा होत असल्याने जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी नियमबाह्य वाळू वाहतूक करणारी अवैध वाळू वाहतुकीची वाहने पकडण्याचा लावलेला धडाका कायम ठेवला दि.०१ जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी गोदाकाठी अचानक धाडसत्र टाकत अवैध नियमबाह्य वाळुची १२ हायवा, एक पोकलँन, दोन ट्रक्टरच्या ट्रॉल्या अशी एकूण १५ वाहने पकडली आहेत. यात दोन हायवा व दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या लासीना येथील पोलिस पाटिल यांच्या ताब्यात तर एक पोकलेन शेळगाव येथील पोलिस पाटिल यांच्या ताब्यात आहे. तर उर्वरीत सर्व वाहने सोनपेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहे. या जप्त केलेल्या अवैध वाहनांमुळे सोनपेठ पोलीस ठाण्याला जनू गॅपेजचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. या अवैध वाळू वाहतूकीची तक्रार काही दिवसापूर्वी सोनपेठमधील सामाजिक कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीत सोनपेठचे महसुल प्रशासन संपुर्ण यंत्रणेसह सहभागी असल्याने तालुक्यातील गोदामाईचे वस्त्रहरण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत असल्याने सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडत चालल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या तक्रारीची जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी तत्काळ दखल घेत कार्यवाही करण्याचा धडाका लावलेला आहे. या कार्यवाहीमुळे सोनपेठ तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिमा *सिंघम* जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. मागील चार दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी पोहंडुळ, गौंडगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारी ६ हायवा वाहने पकडली होती, त्यांना नुकताच १४ लाख रूपये दंड ठोठावल्याचे प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा एकदा लासीना येथील गोदावरी नदी पात्रात केलेली ही धाडसी कार्यवाही सामान्य नागरिकांमधुन समाधान व्यक्त करण्यास पात्र ठरली आहे.
तालुक्यात अवैध वाळू तस्करीत चार बळी गेलेले असून बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आदी जिल्ह्यांसाठी सोनपेठची गोदावरी नदी म्हणजे *सोन्याची अंडी देणारी कोंबडी* असल्याचा समज वाळूमाफियांमधुन झालेला आहे. यामुळे महसुल प्रशासनाला हताशी धरून संपुर्ण अवैध वाळू उपसा जोरात सुरु असून अधिकृत धक्क्यांची बोगस ई.टी.एस.मोजनी करून अहवाल दिल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे.
महसुल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? माननिय जिल्हाधिकारी साहेब तालुक्यातील वाळू घाटावर स्वतः जाऊन धाडसी कार्यवाही करत असल्यामुळे सोनपेठ महसुल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न..? चिन्ह निर्मान झाले आहे.
रस्ते खड्डेमय होण्यात महसुल प्रशासन जबाबदार:-अँड पुष्पक गुजराथी एकंदर तालुक्यात अवैध वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे, त्याचबरोबर तालुक्यात जे रेती ठेके अधिकृतरित्या चालू आहेत त्या रेती ठेक्यावरूण सर्रास नियमाची पायमल्ली केल्या जात आहे. यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने लाऊन दिलेल्या कोणत्याही अटी पाळल्या जात नाहीत. त्याचबरोबर इनव्हाईस क्रंमाक वाहनावर टाकने बंधनकारक असूनही तो क्रंमाक वाहनावर टाकल्या जात नाही; त्यामुळे अवजड, अवैध, विनापावती वाळूची वाहने या रोडवरुन मोठ्याप्रमाणात गेल्याने तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. यासाठी महसुल प्रशासनच जबाबदार आहे.=अँड पुष्पक गुजराथी

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें