शालेय जीवनातील परीश्रम भविष्य घडवितात-निलंगे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

शालेय जीवनातील परीश्रम भविष्य घडवितात-निलंगे.

शालेय जीवनातील परीश्रम भविष्य घडवितात-निलंगे.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०२जून २०१८

सोनपेठ येथील ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने प्रा.रुपेश लक्ष्मणराव देशमुख यांचा वाणिज्य विषयांत सेट परिक्षा उत्तिर्ण झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

राज्य पात्रता परिक्षा (set) २०१८ च्या दि.२४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये सोनपेठ येथील प्रा.रुपेश लक्ष्मणराव देशमुख हे वाणिज्य विषयामध्ये उत्तिर्ण झाले आहेत. या परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकुण ३० विषयाच्या पात्रता परीक्षेसाठी ६२ हजार ४०४ विद्यार्थी बसले होते. त्या पैकी केवळ ६.५२ % म्हणजेच ४ हजार ६७ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यामध्ये सोनपेठ सारख्या शैक्षणिक, भौतिक व भौगोलिक सुविधांपासुन वंचित असलेल्या भागातून परिक्षमपूर्वक यश संपादन केल्याबद्दल प्रा.रूपेश देशमुख यांचा ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने दि.२ जुन रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी दुर्गादास अंबेकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक माणिकराव निलंगे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक निलंगे यांनी रूपेश देशमुख याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी उदाहरण देतं मोलाचे मार्गदर्शन केले. तर रुपेश देशमुख यांनी गुरुजनांच्या योग्य मार्गदर्शनात या पदाचा मानकरी ठरल्याचं सांगत मनोगतं व्यक्त केले. ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी सुत्रसंचालन व सत्कारमुर्तीचा परिचय उपस्थितांना केला, तर आभार राधेश्याम वर्मा यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी माणिकराव निलंगे, दुर्गादास अंबेकर, राजेश्वर खेडकर, ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य तथा पत्रकार सय्यद खदिर विटेकर, गणेश पाटील, राधेश्याम वर्मा, सुभाष सुरवसे, राजेंद्र वेदपाठक, विष्णू शिंदे, पंकज वर्मा, वीरेंद्र खेडकर, गोविंद वर्मा आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें