पुरुषोत्तम मास (आधीक मास ) निमित्त आ.विजय भांबळे यांच्याकडून मौजे वरुड (नृ) येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम संपन्न.
अज़मत पठान.जिंतूर :- दि.०१/०६/२०१८ रोजी मौजे वरुड (नृ) येथे आ.विजय भांबळे यांच्याकडून पुरुषोत्तम मास (आधीक मास ) निमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांचे हरिकीर्तनाणे कार्यक्रमास सुरवात झाली. कीर्तन करताना महराजांनी अधिक मासाचे महत्व सांगत गुरु, संत, सृष्टीचे पालक यांचे महात्म्य आपल्या शैलीत वर्णिले यावेळी सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. अधिक मासातील अन्नदानाचे महत्व पटवून देताना महाराजांनी भगवत गीतेतील अनेक दृष्टांत देऊन अन्नदानाचे ‘पुण्य’ किती महत्वाचे आहे हे स्पष्ट केले.
यानंतर दुपारी १२:०० वा. ते सायं. ६.०० वा. पर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम सुरु झाला. या अधिक मासाच्या धोंडे जेवनानिमित्त तालुक्यातून अलोट प्रतिसाद पहावयास मिळाला. यावेळी तालूक्यासह जिल्ह्यातील प्रमुख मा.सुरेशरावजी वरपूडकर, श्रीनिवास मुंढे, गणेशराव रोकडे, चैतन्य महाराज यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकारी उप-विभागीय अधिकारी मा.श्री.अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पदाधिकारी, विविध सर्व विभागातील कर्मचारी, शहरातील व्यापारी, पत्रकार, वकील, शिक्षक, डॉक्टर, विमा प्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिक तसेच रा.कॉं. ता.अ. मनोज थिटे, जि.प.अध्यक्ष विश्वनाथ राठोड, जि.प.सदस्य नानासाहेब राउत, प्रसादराव बुधवंत, अजय चौधरी, बाळासाहेब घुगे, रामराव उबाळे, अविनाश काळे, अभिनय राउत, विठ्ठल घोगरे, मुरली मत्ते, प.स.सभापती मधुकर भवाळे, उप-सभापती विजय खिस्ते, प.स.सदस्य गणेशराव इलग, सुभाष घोलप, बाबाराव ठोंबरे, प्रल्हाद ढोणे,दिलीप डोईफोडे, किरण दाभाडे, मुन्जाभाऊ तळेकर, प्रकाश शेवाळे, शरद मस्के, नगराध्य्क्ष कपिल फारुकी, उप-नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, न.प.सदस्य श्यामसुंदर मत्ते, आहेमद बागबान, बाळू जाधव, दलमीर पठाण, दत्ता काळे, फेरोज कुरेशी, मनोहर डोईफोडे, प्रदीप चौधरी, शाहेद बेग मिर्झा, उस्मान पठाण, शोएब जानिमिया इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पप्पू मते, संदीप राठोड, पिनु काळे, सचिन बोबडे, सचिन स्वामी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी शहर व ग्रामीण, सरपंच उप-सरपंच व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें