नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याकडून जळीतग्रस्तांस आर्थिक मदत . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 जून 2018

नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याकडून जळीतग्रस्तांस आर्थिक मदत .

नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याकडून जळीतग्रस्तांस आर्थिक मदत .

सिल्लाेड ( प्रतिनिधि)दि 01
मोढा बु. येथील शेतकरी पोपट सहाणे यांच्या राहते घरी अचानक आग लागल्याने संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले.या घटनेने त्यांचा संसार उघड्यावर पडू नये यासाठी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी पिडीत ग्रस्ताची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.
दाेन दिवसांपूर्वी माेढा बु. येथील शेतकरी पाेपट सहाने यांच्या घरास आग लागली हाेती.या घटनेची माहिती मिळताच सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सहाणे परिवाराला आर्थिक मदत केली यावेळी सरपंच रामेश्वर सोनावणे,संभाजी हावळे ,संजय मुरकुटे आदींची उपस्थितीत होती.

आगीचे नेमके कारण समजु शकले नसले तरी गरीब शेतकरी या हानीने खचला आहे.दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसा हा प्रकार असून शासनाकडून सदरील शेतक-यास मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें