मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२६: एम आय एम चे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी समाजवादी पक्षात नुक्ताच प्रवेश केला असुन त्यांची समाजवादी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड ही करण्यात आली आहे. पक्ष वाढिवसाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले असुन याचाच भाग म्हणुन त्यांनी काल दि.२५ जुनरोजी मानवत येथे कार्यकर्ताची बैठक घेऊन कार्यकर्ता मध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
एम.आय.एम.पक्ष हा आपल्याला सतत डावलत असल्याचा आरोप करीत सय्यद मोईन यांनी पक्ष सोडुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आसीम आझमी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्तासह समाजवादी पक्षात प्रवेश केला असुन त्याची कार्याध्यक्षपदी निवड ही करण्यात आली आहे.पुढिल विधानसभा व लोकसभाच्या निवडणुकासाठी सय्यद मोईन यांनी पक्षाला मजबुत करण्यासाठि कार्यकर्ता च्या भेटिगाठी सुरु केल्या असुन मानवत येथील समाजसेवक सय्यद समीर यांच्या बागड प्लाँट येथील निवासस्थानी पक्षाची बैठक घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहे.या वेळी समाजवादी पक्षाचे कार्यध्याक्ष सय्यद मोईन यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी सय्यद समीर ,स.मुजीब ,स.सुल्तान,शे. मुकतार बाबा,वाजेद भाई,महेबूब पिंजारी,अबरार बागवान आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें