सेलू येथील डॉ मालपाणी यांची नोंदणी रद्द करा.चुकिचा सोनोग्राफी रिपोर्ट प्रकरण.शिवा संघटनेची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 जून 2018

सेलू येथील डॉ मालपाणी यांची नोंदणी रद्द करा.चुकिचा सोनोग्राफी रिपोर्ट प्रकरण.शिवा संघटनेची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी.


सेलू (प्रतिनिधी).समशेर खान.
          सेलू येथील डॉ मनोज मालपाणी यांनी रुग्णास किडणीस्टोन नसतांनाही दोन किडणीस्टोन असल्याचा धडधडीत चुकीचा रिपोर्ट दिला या प्रकरणी डॉ मनोज मालपाणी यांची चौकशी करून त्यांच्या  दवाखाण्याची नोंदणी रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय विरशैव युवक संघटना सेलू यांच्यावतीने मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे.
                      अखिल भारतीय विरशैव युवक संघटना सेलू यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की,सेलू येथील डॉ मनोज मालपाणी यांचे सोनोग्राफी सेंटर यापुर्वीच वादग्रस्त ठरले होते .२४ मे रोजी अथर्व रेवणअप्पा साळेगांवकर (वय १२वर्षे) याला किडणीस्टोन नसतांनाही दोन किडणीस्टोन आसल्याचा धडधडीत खोटा रिपोर्ट दिला.खरी वस्तुस्थीती अशी आहे की अथर्व साळेगांवकर यास अपँडिक्स चा त्रास होता हि बाब परभणी येथील सोनोग्राफी मध्ये निष्पन्न झाली त्यानंतर अथर्व चे अपँडिक्स चे आँपरेशन परभणी येथील यमुना हाँस्पीटल डॉ माघाडे यांचेकडे करावे लागले. अथर्व साळेगावकर ची प्रकृती ठीक झाल्यानंतर ११ जून रोजी पुन्हा एकदा वरद सोनोग्राफी सेंटर सेलू येथे अथर्व ची सोनोग्राफी केली यामध्येही किडणीस्टोन नसल्याचा अहवाल मिळाला आहे त्यामुळे दोन  किडनी स्टोन असल्याचा डॉ मनोज  मालपाणी यांनी दिलेला अहवाल हा चुकीचा होता ही बाब आधारित झालेली  आहे  या चुकीच्या अहवालानुसार अथर्व चे ऑपरेशन केलेत्रअसते तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता .त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. मनोज मालपाणी यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी व त्यांच्या दवाखान्याची नोंदणी रद्द करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे .या निवेदनावर तालुकाध्यक्ष निजलिंगअप्पा तरवडगे ,तालुका संघटक शिवकुमार नावडे ,शहराध्यक्ष सुनिता डफुरे यांच्यासह अन्य जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 *सोनोग्राफी मशीन शिल करणेबाबत डॉ प्रिती मेहता यांनी  ग्राहक संरक्षण परीषदेत उठवला आवाज.*
            जिल्हाधिकारी कार्यालयात २१ जुन रोजी जिल्हाधिकारी पि.शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच्या वतीने सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या कार्यकर्त्या व जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच्या सदस्या डॉ प्रिती अशीष मेहता यांनी तक्रार अर्ज व याबाबत प्रसिध्द झालेल्या बातम्याचा आधार घेऊन सभागृहात याबाबत आवाज उठवत सोनोग्राफी मशीन शिल करण्याबाबत आग्रही मागणी केली .जिल्हाधिकारी शिव शंकर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन तात्काळ चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.

  *पोलिस निरीक्षक यांनी मागवला  शल्यचिकित्सक यांना अहवाल*
                         चुकीच्या सोनोग्राफी रिपोर्ट  प्रकरणी रेवणअप्पा साळेगांवकर यांनी १२ जुन रोजी सेलू पोलीस ठाण्यात  दाखल केलेल्या फिर्यादी ची पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ नितीन काशीकर यांचे कडे तपास दिला आहे .स.पो.नि.डॉ नितिन काशीकर यांनी प्राथमिक चौकशी पुर्ण करून याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रकरण वर्ग करून स्वंयस्पष्ट अहवाल मागवला आहे.हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या प्रमाणे कार्यवाही निश्चित होईल अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें