बीडमध्ये अफवा पसरविणारे पोलिसांच्या रडारवर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 जून 2018

बीडमध्ये अफवा पसरविणारे पोलिसांच्या रडारवर.


बीड - मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा पसरवून घबराटीचे वातावरण निर्माण करणारे पोलिसांच्या रडारवर असून शनिवारी बीड शहरातील एका तरुणावर गुन्हा नोंदविण्यात आला.

या तरुणाने लहान मुलांना पळवून नेणारा पारधी रंगेहाथ पकडल्याची खोटी माहिती विविध व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकली होती.

सध्या बीड जिल्ह्यात मुले पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवांचे सोशल मिडीयावर पेव फुटले आहे.

अनेकजण कुठलीही शहानिशा न करता अश्या अफवांचे मॅसेज जशास तसे फाॅरवर्ड करत आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून लहान मुले आणि पालकत दहशतीचे वातवरण आहे.

मागील काही दिवसात या अफवांचा नाहक त्रास अनेक निष्पापांना सहन करावा लागला. शहरात कामानिमित्त आलेली अनोळखी माणसे, भिकारी, मनोरुग्ण, भंगार गोळा करणारे आदी लोक अफवांमुळे नागरिकांच्या रागास बळी पडले. अफवांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस दलाने अनेक माध्यमातून जनजागृतीसाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले.

तरीसुद्धा आणखी काही ठिकाणाहून अश्या अफवा पसरविण्यात येतच आहेत. त्यामुळे पोलीस सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

बीडमधील सचिन डोंगरे नामक तरुणाने “बलभीमनगर पेठ बीड येथे लहान मुलाला घेऊन जाताना एक पारधी माणूस रंगेहाथ धरला” अशी खोटी माहिती अनेक व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकली.

या अफवेमुळे काही काळ खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी याची तातडीने आणि गांभीर्याने दखल घेऊन सचिन डोंगरे याच्यावर पेठ बीड ठाण्यात कलम ५०५(१) अन्वये गुन्हा नोंदविला.

यापुढे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर अश्याच पद्धतीने कडक कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें