शेतकरी " राजा " संपावर .... काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गणेशराव पाटील दौड यांचे निधन ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 जून 2018

शेतकरी " राजा " संपावर .... काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गणेशराव पाटील दौड यांचे निधन ;

शेतकरी " राजा " संपावर ....

काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गणेशराव पाटील दौड यांचे निधन ;

सिल्लोड (संतोष लहाने ) दि 01
विश्वासही न बसणारी बातमी कानी पडली....व्हाट्स अॅप - फेसबुक वर मामाचा फोटो झळकला....काही वेळ स्तब्ध होऊन मनातल्या - मनात गोंधळल्यागत अवस्था झाली....अवघ्या काही क्षणातच कार्यकर्ते - नागरिकांची फोनं खणखणू लागली....बातमी खरी आहे का...? होय...आपल्यातील आपले एक कणखर नेतृत्व करणारे....दहा वर्षे काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष पद भूषविलेले आपणा सर्वांचेच " मामा " गणेशराव पाटील दौड (वय 59)हे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवार रोजी सकाळी 02:30 वाजेच्या सुमारास आपल्यातून निघून गेले....! संध्याकाळी 04 :00 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर पानवडोद येथील पंचक्रोशीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेशराव पाटील दौड (मामा) यांनी सिल्लोड तालुकाअध्यक्ष काँग्रेस कमिटीच्या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सिल्लोड मतदारसंघांतील गावा - गावांतील पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची संघटनात्मक बाजू भरभक्कम करुन राजकीय पटलावर आपली बुलंद तोफ गाजवण्याचे काम केले.
काँग्रेसच्या तालुकाअध्यक्ष पदाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत दहा वर्षे माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या विजयी दौड - घोडीत कणखर नेतृत्वाच्या रुपात राजकीय वादळ पाहण्यास मिळाले.
सतत शेतकरी - शेतमजुरांच्या विविध अडी अडचणी सोडविण्याबरोबरच शासनाविरोधात
शेतक-यांच्या भल्यासाठी आंदोलन - मोर्चे - उपोषण करुन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार - माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या नेतृत्वाखालील शासनविरोधी मोर्चांमध्ये परिसर घोषणांनी दणाणून सोडून मोर्चेकरांना स्फुर्ती देण्याचे काम करीत लक्ष वेधले.
सततच्या दुष्काळामुळे होरपळून निघत असलेल्या बळीराजाला कर्जबाजारीपणाच्या कचाट्यातून मुक्ती मिळविण्यासाठी शेतक-यांना कर्जमाफी मिळायलाच हवी. शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करीत असतांना सरकार झोपेचे सोंग घेऊन बळीराजाची फसव्या आश्वासनाची घोषणाबाजी करीत आंदोलकांवरही कुरघोडीचे राजकीय षडयंत्र रचीत शेतकरी - शेतमजुरांच्या हातावर एकप्रकारे " तुरी "देण्याचे काम प्रशासन करीत असल्याची टिका वेळोवेळी करीत आपली बुलंद तोफ गाजवित
शेतक-यांच्या भल्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधले.
पण आज आपल्यातील आपला माणुस शेतकरी -शेतमजुरांच्या भल्यासाठी लढणारा कणखर नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केलेला लढवय्या सर्वांचा " मामा " हृदयविकाराच्या झटक्याने आपल्यातून हरवला आहे.
आजपासून शेतकरी शासनाविरोधात संपावर जाणार आहे तर दुसरीकडे शेतकरी - शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी सतत शासनाविरोधात लढणारा " मामा " " शेतकरी राजाच " कायमचा संपावर गेलाय असे म्हणायला हरकत नाही....!
सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव पाटील दौड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, माजी आ.कल्याणराव काळे,नितिन पाटील,सांडु लोखंडे,नामदेवराव चापे,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबरच पंचक्रोशीसह सिल्लोड मतदारसंघांतील हजारो नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें