भरधाव जीपच्या धडकेत दुचाकी स्वार ठार.एकतुनी शिवारातील घटना.
पैठण तालुका प्रतिनिधी
ता. ७ - राॅंग साईडने भरधाव वेगात जाणाऱ्या कुलुझर जीप दुचाकी ला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना एकतुनी - भायगाव रस्त्या वरील एकतुनी ता पैठण शिवारात गुरुवार (ता. ७)सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जीप चालका विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश नाथा बनकर वय ४४ वर्षे, राहणार बाजार वाहेगाव ता. बदनापूर हे दुचाकी क्रमांक एम एच २० सी एफ ७४४६ ने मुलीला माहेरी आणण्यासाठी गुरूवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एकतुनी मार्गे पाचलगावकडे जात होते त्यावेळी एकतुनी कडुन राँग साईडने भरधाव वेगात येणारी कुलुझर जीप क्रमांक एम एच २८ सी ५०१० ने दुचाकी ला जोराची धडक दिली यात सुरेश बनकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण राठोड, शिवाजी जाधव करीत आहे.
फोटो कॅप्शन =एकतुनी ता पैठण शिवारात झालेल्या अपघातातील अपघात ग्रस्त दुचाकी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें