सिल्लोड येथे एकता अप्पे ग्रुप च्या वतिने इफ्तार पार्टीचे आयोजन.
देशाच्या एकतेसाठी मुस्लीम समाजाने ईश्वरचरणी केली प्रार्थना.
शेख कलीमसिल्लोड आज दिनांक ५ रोजी मंगळवार सिल्लोड येथील प्रियदर्शनी चौक मध्ये एकता अप्पे ग्रुप च्या कडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख एम.आई.एम.च्या शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)तालुका अध्यक्ष बनेखान पठाण यांची उपस्थिती होती.या सामाजिक कार्यक्रमास मोठ्या संख्यने हिंदू आणि मुस्लीम नागरिकांनी उपस्थित राहून इफ्तार केले तर इफ्तार च्या अगोदर सर्व रोजादारांनी देशा च्या एकते अखंडतेसाठी प्रार्थना केली या सहित उपविभागीयपोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनवीर मन्सुरी,शाहरुख मन्सुरी,नईम शेख,इम्रान शेख,रेहान शेख,सलमान मन्सुरी,एजाज मन्सुरी,रईस पठाण,आजम शेख,नदीम शेख,जुनेद शेख अजीम पठाण,अक्रम शेख,समीर बागवान,शफिक अजिंठाकर फाहद चाऊस,वासिम मौलाना,मुश्ताक शेख आदींनि परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर सर्व प्रमुख पाहुणे यांनी एकता ग्रुप चे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें