सोनपेठयेथे रमजान ईद उत्सात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

सोनपेठयेथे रमजान ईद उत्सात साजरी.

सोनपेठयेथे रमजान ईद उत्सात साजरी.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१६जून २०१८

सोनपेठ शहरात रमजान ईद उत्साहत साजरी  करण्यात आली. वाण नदी तीरावर असलेल्या सोनखेड येथील ईदगाह मैदानावर मौलाना हाफिज गफार यांच्या नेतृत्वात मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची पवित्र नमाज  आदा करून सर्वांसाठी सुख, समृद्धी, शांतता व सुरक्षीततेसाठी अल्लाहास प्रार्थना केली. या नंतर सामाजीक व धार्मिक एकतेचे प्रदर्शन करीत शहरातील मुस्लीम व मुस्लीमेतर बांधवांनी आपापसात गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छादेत एकतेचा संदेश दिला.
मुस्लीमसमाजातील अबालवृद्ध ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी सामील झाले होते. ईदच्या नमाज नंतर देशाच्या प्रगती साठी व सर्व बांधवानच्या सुरशितते साठी दुआ करण्यात आली, नमाज नंतर एकमेकांना गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहरातील राजकीय, सामाजीक, शैक्षणीक, मित्रमंडळ, पत्रकार बांधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह उपस्थित होते. दुपारनंतर घरोघरी शिरखुर्मा पिण्यासाठी सर्व जाती धर्माच्या मित्रमंडळीला आमंत्रीत करण्यात आले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें