मुले चोरण्याच्या धास्तीने नागरीकांमध्ये घबराट- - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

मुले चोरण्याच्या धास्तीने नागरीकांमध्ये घबराट-

मुले चोरण्याच्या धास्तीने नागरीकांमध्ये घबराट-
सावळीविहीर (प्रतिनिधी)-कु- किरण जाधव.दि.16/06/18.
चोरांच्या नावाने परिसरात घबराटीचे वातावरण शिर्डी व परिसरात गेल्या आठवड्यापासुन लहान मुलांची चोरी करणारी टोळी परिसरात आली आहे. असे अनेक नागरीकांनी सांगितले.     
   काही भागात साड्या घालुन पुरूष हे रात्री लहान मुलांची चोरी करण्याचे प्रकार सुरू झाल्याने परिसरातील नागरीकांमध्ये चोर या नावाची भिती निर्माण झाली आहे. याबाबत शिर्डी व परिसरात रात्री गस्त घालण्यास सुरूवात केली आहे.
दोन दिवसांपुर्वी शिर्डी बसस्थानक परिसरात एका लहान मुलाला पळवुन घेवुन जाणारा इसम लोकांनी पकडला, त्याला चांगला चोप दिला. व त्या लहान मुलाला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देवुन त्या इसमाला ताब्यात घेतले.        या सर्व प्रकरणामुळे लहान मुले व त्यांच्या आई-वडीलांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे. रात्री, अपरात्री- रस्त्यावर, शेतात चोरांचे प्रमाण देखील वाढले. त्यात सोशल मिडीयावर अनेक लहान मुलांचे फोटो, व्हिडीओ येत असल्याने ही बाब खरी कि खोटी अशी शंका येत आहे.          तरी या संदर्भातील अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याची योग्य विचारपुस करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देवुन चौकशी करावी. पोलिसांची रात्रीची गस्त वाढवल्याने नागरीकांची भिती कमी होईल, अशी मागणी नागरीक करीत आहेत..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें