भोकरदन तालुक्यात बारावीचा निकाल ९३.७२ टक्के.
मुलींनी मारली बाजी.
ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकले.
शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला असून .महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुरवारी / मार्च २०१८ मध्ये घेण्यात आली होती. भोकरदन येथील अलहूदा ऊर्दू उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६% लागला असून.कला शाखेचे एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्या पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विज्ञान शाखेचे ७८ विद्यार्थी पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनमध्ये प्रथम क्रमांक समरीन स.इद्रीस -८४.६०% ,द्वितीय - कुरेशी आयशा जाकीर ८२.८०% तर तृतीय क्रमांक कुरेशी असलमा सलीम हिने ८१.५३% घेतले आहे. तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक शेख समीर नासेर - ८७.५३% ,द्वितीय आलीया मुक्तार शाह -८६.१५% तर एका ग्रामीण भागातील विद्यार्थी सरफरास अकिल याने ८४.९२% घेऊन याचा तृतीय क्रमांक आला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शब्बीर अहेमद कुरेशी ,सचिव गुलाब खान,प्राचार्य युनूस खान ,मुखध्यापक कामिल पटेल,सादिक सर,मुजमिल सर,फेरोज खान,शेख जावेद आदिंनी अभिनंदन केले आहे.
तर केदारखेडा येथील श्री रामेशवर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००% लागला असून उत्कृष्ट निकालाची पंरपरा कायम राखली आहे.विज्ञान शाखेतून कु.लुटे वैष्णवी कैवतिकराव ९०.००% गुण घेऊन प्रथम आली तर कु.जंजाळ भारती सुभाष हिने ८४.९२% कु.खेकाळे अश्विनी संतोष हिने ८१.३८% गुण मिळवत अनुक्रम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.कला शाखेतून कु.ढवळे सुष्मा प्रभाकर ७८.९२% गुण घेऊन प्रथम आली तर कु.गंगावणे विशाखा मिलिंद हिने ७८.१५% तर आदबाने कृष्णा अंकुश याने ७७.६९% गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव गिऱ्हे,सचिव केशव जंजाळ,सहसचिव नंदकुमार गिऱ्हे, प्राचार्य एस.एन.बोर्डे,प्रा.तांगडे,मिलिंद सावंत तसेच सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच श्री संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी : संभाजी विद्याल्याचा निकाल १००% लागला असून विद्यार्थ्यांनी १२ वी परीक्षेत बाजी मारल्याने संस्थेचे अध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे,सचिव निर्मलाB दानवे,मार्गदर्शक संतोष दानवे,नारायण पैठणकर तसेच शिक्षक व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तर दानापूर येथील केशराबाई कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी याने ७६% घेऊन विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला त्याचा शिक्षक व तसेच प्राचार्य व विद्यालयांच्या वतीने अभिनंदन केले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें