मानसिक ञासाला कंटाळून आत्महत्यास प्रवृत्त करीत असल्याची तक्रार दाखल; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 31 मई 2018

मानसिक ञासाला कंटाळून आत्महत्यास प्रवृत्त करीत असल्याची तक्रार दाखल;

मानसिक ञासाला कंटाळून आत्महत्यास प्रवृत्त करीत असल्याची तक्रार दाखल;

सराटी येथील महिलेची उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 31
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे हे आपल्या कुटुंबीयांना नाहक मानसिक ञास देत आत्महत्यास प्रवृत्त करीत असल्याची तक्रार येथील महिलेने उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार सिल्लोड यांच्याकडे दाखल केली आहे .
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील द्वारकाबाई आप्पा गुळवे या महिलेने आपला पती आप्पा भिका गुळवे हे अनेक दिवसांपासून मानसिक दडपणाखाली वावरत आहेत.येथील पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे हे नाहकच मानसिक ञास देत आहेत. मागील वर्षी (12/09/2017) रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून तसेच या मानसिक ञासाला कंटाळूनच माझ्या पतीने किटकनाशक औषधी प्राशन करून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांच्यावर तात्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करुन किटकनाशक औषधी काढण्यात यश मिळाले पण त्यावेळी मला कुणाचाच ञास नसल्याचे जबाबात सांगितले असले तरी अनेक महिन्यांपासून मला पोलिस पाटील सुंदर गुळवे हे मानसिक ञास देत असल्याचे वेळोवेळी सांगित आहेत. त्यांच्या मानसिक ञासाला कंटाळूनच माझ्या पतीने मागील वर्षी किटकनाशक औषधी प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी मला शंका उत्पन्न होत आहे , करीता येथील पोलिस पाटील सुंदर गुळवे यांची चौकशी करुन आम्हा कुटुंबीयांना होत असलेला मानसिक ञास थांबविण्यात यावा असी मागणी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिल कार्यालय सिल्लोड तसेच अजिंठा पोलीस ठाण्यात सराटी येथील महिला द्वारकाबाई आप्पा गुळवे यांनी तक्रार दाखल केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें