चिकलठाना बु.येथे दर्गा जवळ अवैध दारु विक्री होत असल्याची पोलिस निरिक्षकाडे तक्रार करुन देखील अवैध दारु विक्री चालुच.
गावकर्यांने या संबधी दि.01/05/2018 रोजी लेखी तक्रार केलती.
अनवर पठान.(संपादक)
चिकलठाना बु.ता.सेलु येथे अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. चिकलठाना येथील दर्गा जवळ अवैध दारु विक्री होत असुन याठिकानी लोक दारु पिण्यासाठी येतात. गाड्या रस्त्यावर उभ्या ठेवून तासनतास दारु पित व गप्पा मारत बसतात. वाईट-वाईट बोलतात. सामान्य नागरिकांना रस्त्याने जाणे-येणे अवघड असते. त्याचा त्रास गावातील महिला व नागरिकांना, मुलींना होतो.
कुणी काही बोलले तर दारु विकणारे महाशय लोकांच्या घरावर चढून जातात व बनते ते करुन टाक अशी धमकी देतात.
या संबधि गावातील लोकांनी सेलु पोलिस स्टेशनला एक लेखी निवेदन दिले आहेत.निवेदनात नमुद केले आहे कि दुर्गादास बुधवंत नाचा व्यक्ती हा या ठिकानी स्वतःच्या घरातुन दारु विक्री करीत असुन हा अवैध दारु विक्री व्यसाय धार्मिक स्थळा जवळ असल्याने नागरीकाचे भावना दुखावले जात आहे.संबधीत व्यक्तीवर कार्यवाहि करण्याची मागनी केलेली असताना देखील या ठिकानी अवैध दारु विक्री खुलेआम चालुच आहे.व निवेदनात अवैध दारु विक्री करनाराचे नाव सुध्दा नमुद केलेले असताना या प्रकरणी पोलिस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे.पोलिस प्रशासन मिळुन मिसळुन मलिदा तर खात नाहि न आशी चर्चा जनतेनुन केली जात आहे.
निवेदनावर सय्यद कयुम स.नबी,शे.बिलाल,सोहेल पठान,सिकंदर बेग,जिवन जाधव,बळीराम जाधव,सुभाष गायकवाड,शांताबाई धापसे,वंदना सधाकर भलेराव, असे एकुन 33 स्वक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें